जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी संशयित दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर भाविकांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात १० लोकांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरच्या रियासीमधील शिवखोरी येथे भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर रविवारी हल्ला झाला. त्यानंतर बस खोल दरीत कोसळून सात जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
रियासीचे जिल्हाधिकारी विशेष महाजन यांनी घटनेची पुष्टी करताना सांगितले की, बस दरीत कोसळल्याने १० लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, संशयित दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला. ही बस भाविकांना घेऊन शिव खोडी मंदिराकडे जात होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार पोनी परिसरातील तेरीयाथ गावात बसवर हल्ला झाला. घटनेची माहिती मिळताच मदत व बचाव कार्य सुरू केले गेले.
अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून बस रस्त्यापासून खूप खोल दरीत कोसळल्याचे दिसत आहे. घटनास्थळी लोकांची गर्दी झाली आहे. बस दरीत कोसळल्याने त्यातील प्रवासी बाहेर फेकले गेले व दगडांवर आपटले. मृतांमध्ये महिलांचाही समावेश आहे.
अधिकाऱ्यांनी प्राथमिक माहित्याच्या हवाल्याने सांगितले की, शिव खोडी मंदिराकडे जात असलेल्या भाविकांच्योंया बसवर तेरियाथ गावात हल्ला केला गेला. त्यांनी सांगितले की, मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. शिवखोरी मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांना घेऊन निघालेल्या बसवर पोनी परिसरातील तेरियाथ गावात हल्ला करण्यात आला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरस येथून येणारी बस अखनूरमध्ये खोल दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ महिला आणि दोन मुलांसह २२ भाविकांचा मृत्यू झाला होता, तर ५७ जण जखमी झाले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये डोडा जिल्ह्यात एक बस डोंगरावरून ३०० फूट खाली घसरून दुसऱ्या रस्त्यावर कोसळून झालेल्या अपघातात ३९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर १७ जण जखमी झाले होते.
Pune drowns : पुण्यात बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुली बुडाल्या, एकीचा मृत्यू; तिघांना वाचविण्यात यश!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकासह ५६ प्रवाशांना घेऊन खासगी बस १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी किश्तवाडहून जम्मूच्या पाच तासांच्या प्रवासासाठी निघाली होती. मात्र, डोडा येथील असर भागात सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यातील खानाबल ते रामबनमधील बटोटे यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २४४ (एनएच २४४) वर अस्सरमधील त्रुंगल येथे हा अपघात झाला.