मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  वऱ्हाड घेऊन निघालेल्या बसवर पडली हायटेन्शन वायर; अनेक जण जिवंत जळाले

वऱ्हाड घेऊन निघालेल्या बसवर पडली हायटेन्शन वायर; अनेक जण जिवंत जळाले

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 11, 2024 07:36 PM IST

Bus Accident :बसवर हायटेंशन तार पडल्यामुळे बस जळून खाक झाली. यामध्ये अनेक लोक जिवंत जळाले. ही दुर्घटना उत्तरप्रदेशातील गाजीपूर येथे घडली.

जळालेली बस
जळालेली बस

उत्तरप्रदेश राज्यातील गाजीपूरमध्ये मोठा अपघात झाला आहे. बसवर हायटेंशन तार पडल्यामुळे बस जळून खाक झाली. यामध्ये अनेक लोक जिवंत जळाले. आतापर्यंत सहा जण मृत्यूमुखी पडल्याचे सांगण्यात येत आहे. तर १० हून अधिक गंभीररित्या भाजले आहेत. बसमधून ३५ लोक प्रवास करत होते. बस लग्न समारंभाहून परतत होती. हा अपघात मरदह येथे झाला. 

बस मऊ येथील कोपागंजहून लग्नाचे वऱ्हाड घेऊन मरदहमधील महाहर धामकडे जात होती. यावेळी कच्च्या रस्त्याने जात असताना हा अपघात झाला. मृतांपैकी मऊ जिल्ह्यातील खिरिया गावातील भगेलू राम आणि कलावती देवी यांची ओळख पटली असून अन्य मृतांची ओळख पडवण्याचे काम सुरू आहे. 

मऊ जिल्ह्यातील खिरिया काझा येथून लग्नाचे वऱ्हाड गाजीपूरमधील मरदह येथे असणाऱ्या महाहर मंदिराकडे जात होते. काम सुरू असणाऱ्या कच्च्या रस्त्याने जात असताना बसला अपघात झाला. यावेळी ११ हजार व्होल्टची हायटेंशन तार बसवर कोसळ्याने बसला आग लागली. यानंतर आतील लोक ओरडू लागले. काहींना बसमधून उड्या मारल्या. स्थानिक लोक मदतीसाठी धावले मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. ग्रामस्थांनी तत्काळ याची सूचना पोलिसात दिली. या अपघातानंतर जिल्ह्याधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मऊ येथील कोपागंज येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन बस मरदह येथील महाहर धाम येथे येत होती. त्यावेळी बसचा अपघात झाला. 

WhatsApp channel