कुठे फेडाल पाप.. ! महात्मा गांधींच्या नावाने काढली बीअर, बाटलीवर बापूचा फोटा पाहून भडकले लोक
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कुठे फेडाल पाप.. ! महात्मा गांधींच्या नावाने काढली बीअर, बाटलीवर बापूचा फोटा पाहून भडकले लोक

कुठे फेडाल पाप.. ! महात्मा गांधींच्या नावाने काढली बीअर, बाटलीवर बापूचा फोटा पाहून भडकले लोक

Updated Feb 15, 2025 08:02 PM IST

सुपर्णो सत्पथी यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझी नम्र विनंती आहे की, त्यांनी आपले मित्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित करावा. एक रशियन कंपनी गांधीजींच्या नावाने बिअर विकत असल्याचे समोर आले आहे.

बिअरच्या बाटलीवर गांधीजींचा फोटो
बिअरच्या बाटलीवर गांधीजींचा फोटो

रशियन दारू विक्रेत्याने बिअरच्या कॅनवर महात्मा गांधींची प्रतिमा वापरली आहे. यामुळे सोशल मीडियावर युजर्स संतापले असून त्यांनी पंतप्रधान मोदींना हा मुद्दा रशियासमोर मांडण्याचे आवाहन केले आहे. रशियन ब्रँड रिव्हर्टने बनवलेल्या बिअरच्या डब्यांचे फोटो ऑनलाइन समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. कंपनीने या बिअरला महात्मा गांधी यांचे नावही दिले आहे. ओडिशाच्या माजी मुख्यमंत्री नंदिनी सत्पथी यांचे नातू आणि राजकारणी सुपर्णो सत्पथी यांनीही एक्सवर याचे फोटो शेअर केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझी नम्र विनंती आहे की, त्यांनी आपले मित्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित करावा. एक रशियन व्यक्ती गांधीजींच्या नावाने बिअर विकत असल्याचे समोर आले आहे. बिअरच्या कॅनवर महात्मा गांधींचे छायाचित्र छापलेले असल्याचे या पोस्टमधील छायाचित्रांवरून स्पष्ट होते. हे पाहून युजर्स प्रचंड संतापले होते.

सोशल मीडियावर युजर्सचा संताप -

एका युजरने महात्मा गांधी आणि दारूचा काय संबंध आहे,  हा फोटो का छापण्यात आला आहे, असा सवाल केला आहे. आणखी एका युजरने लिहिले की, हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. गांधीजींचा आणि दारूचा काय संबंध? अल्कोहोलवर त्यांचे नाव आणि फोटो वापरणे थांबवा, ते मद्यपी नव्हते, त्याऐवजी त्यांच्या व्यक्तिमत्त्वास साजेसे इतर उत्पादनांवर त्यांचे नाव आणि फोटो वापरा.

आणखी एका सोशल मीडिया युजरने या ब्रँडिंगवर टीका करताना म्हटले आहे की, "धक्कादायक आणि अस्वीकार्य आहे. एक रशियन दारू उत्पादक कंपनी रेवॉर्ट महात्मा गांधींच्या नावाने दारू विकून शांतीचे प्रतीक महात्मा गांधी यांच्या तत्वांचा व मुल्यांची खिल्ली उडवत आहे.  हा भारताच्या मूल्यांचा आणि कोट्यवधी भारतीयांचा अपमान आहे. 

सुपर्णो सत्पथी यांनी आपल्या पोस्टमध्ये अनेक फोटो शेअर केले आहेत. बिअरच्या कॅनवर महात्माजी लिहिले आहे आणि त्यावर गांधीजींचे छायाचित्रही छापले आहे. कंपनीचे नाव रिव्हर्टही दिसत आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून जवळपास दीड लाख व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय मोठ्या संख्येने लोकांनी दारू उत्पादक कंपनीवर कमेंट करत टीका केली आहे.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर