Maharashtra Election : ईव्हीएम संदर्भातील सर्व तक्रारींचं उत्तर देणार आणि ते प्रसिद्धही करणार - निवडणूक आयोग
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Maharashtra Election : ईव्हीएम संदर्भातील सर्व तक्रारींचं उत्तर देणार आणि ते प्रसिद्धही करणार - निवडणूक आयोग

Maharashtra Election : ईव्हीएम संदर्भातील सर्व तक्रारींचं उत्तर देणार आणि ते प्रसिद्धही करणार - निवडणूक आयोग

Published Oct 15, 2024 03:26 PM IST

Maharashtra vidhan sabha Election 2024 live updates : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं.

Maharashtra Assembly Election 2024 Live : थोड्याच वेळात महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा
Maharashtra Assembly Election 2024 Live : थोड्याच वेळात महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा

Maharashtra vidhan sabha Election 2024 live updates : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा आज झाली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक वेळापत्रक लाइव्ह अपडेट्स:

 

> राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह तुतारी आहे. त्या संदर्भात आमच्याकडं दोन मागण्या आल्या आहेत. त्यांना देणग्या घेण्याच्या परवानगी दिली आहे. तुतारी चिन्ह नेमकं कसं हवं हे आम्ही त्यांच्याकडून मागवलं होतं. त्यांनी दोन पर्याय दिले होते. त्यातील पहिला आम्ही मान्य केला. आता जे तुतारी चिन्ह राष्ट्रवादीकडं आहे, त्याच्याशी थेट साधर्म्य साधणारं दुसरं कुठलंही चिन्ह आम्ही दिलं नव्हतं. जे चिन्ह दिलं गेलं होतं, ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हाशी जुळणारं नव्हतं - राजीव कुमार

> ईव्हीएम हाताळणीच्या प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सोबत असतात. मशीनमध्ये मतदानाच्या पाच ते सहा दिवस आधी पक्षचिन्ह टाकली जातात. त्यानंतर बॅटरी टाकली जाते. त्यानंतर ती मशिन्स पक्षाच्या प्रतिनिधींच्या समोरच ती लॉकर रूमध्ये जातात. या संपूर्ण प्रक्रियेत आतापर्यंत कोणी आक्षेप घेतलेला नाही. शिवाय आतापर्यंत झालेल्या निवडणुकांचे निकाल वेगवेगळे लागले आहेत - राजीव कुमार

> ईव्हीएम संदर्भात आमच्याकडं २० तक्रारी आल्या आहेत. त्या प्रत्येकाचं सविस्तर उत्तर आम्ही देणार आहोत. लेखी उत्तर लवकरच देऊ. ह्या सगळ्या तक्रारी आणि आमचं उत्तर प्रसिद्धही केलं जाईल - राजीव कुमार

> आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर पाच मिनिटांनी, दहा मिनिटांनी कल यायला लागतात. प्रत्यक्षात मोजणी साडेआठ वाजता सुरू होते. हरयाणाच्या निकालाच्या वेळी तसंच झालं. याचा अर्थ स्वत:चे एक्झिट पोल खरे ठरवण्यासाठी सुरुवातीला त्यानुसार निकाल दिले गेले असतील. नंतर वस्तुस्थिती समोर आली की गोंधळ उडतो. त्या नैराश्यातून मग काही लोक आरोप करतात. त्यावर आत्मचिंतनाची गरज आहे - राजीव कुमार

> एक्झिट पोल आमच्या अखत्यारीत येत नाहीत. त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या वेगळ्या संस्था आहेत. गरजेनुसार त्या त्यावर नियंत्रण आणतील - राजीव कुमार यांची अपेक्षा

> झारखंडमध्ये मागील वेळेस ५ टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. आता दोन टप्प्यात होत आहेत. त्याची काही कारणं आहेत - राजीव कुमार

> पोलीस महासंचालकांची नियुक्ती करण्याची एक प्रक्रिया आहे. यूपीएसएसी ती नियुक्ती करते. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचाही निकाल आहे. रश्मी शुक्ला यांचं नाव यूपीएससीनं क्लिअर केलंय - राजीव कुमार

> झारखंडमध्ये दोन टप्यांत मतदान. पहिल्या टप्प्याचं मतदान १३ नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान २० नोव्हेंबरला होणार. झारखंडचा निकाल २३ नोव्हेंबरला महाराष्ट्रासोबतच घोषित होणार

>  महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार 

> महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार

> कोणत्याही निवडणूक अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल - राजीव कुमार

> ८५ वर्षांच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदान करता येणार. त्यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था केली जाणार. त्यांच्या मतदानाची पूर्ण गुप्तता पाळली जाणार. व्हिडिओग्राफी होणार - राजीव कुमार

> सर्व मतदान केंद्रावर पुरेशा सुविधा असतील - राजीव कुमार

> झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ रोजी संपणार आहे - राजीव कुमार

> महाराष्ट्रात एकूण १ लाख १८६ मतदान केंद्रे आहेत - राजीव कुमार

> महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०२४ ला संपणार आहे. राज्यात ९.६३ कोटी मतदार आहेत - राजीव कुमार

> लोकांनी निवडणूक प्रक्रियेवर विश्वास दाखवला आहे. तरीही लोक बोलत असतात. कुछ तो लोग कहेंगे… ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांना राजीव कुमार यांचा टोला

> निवडणूक आयोगानं करून दाखवलंय. हरयाणा व जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराची एकही घटना झालेली नाही. साधा लाठीमारही झालेला नाही - राजीव कुमार

> मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार पत्रकार परिषदेला संबोधित करत आहेत.

> निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू

> महाराष्ट्रातील निवडणूक एकाच टप्प्यात होणार की एकापेक्षा जास्त टप्प्यात? निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडं लक्ष

> महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी होणार निवडणूक

> राज्यातील सत्ताधारी महायुती व विरोधी पक्षांची महाविकास आघाडीमध्ये होणार जोरदार टक्कर

> महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच होतेय विधानसभा निवडणूक

> मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार नवी दिल्लीतून करणार निवडणुकीची घोषणा

> महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार

> थोड्याच वेळात केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर