मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Swachh Survekshan : महाराष्ट्र ठरलं देशातील सर्वात स्वच्छ राज्य; स्वच्छ शहरांच्या यादीत राज्यातील तीन शहरे

Swachh Survekshan : महाराष्ट्र ठरलं देशातील सर्वात स्वच्छ राज्य; स्वच्छ शहरांच्या यादीत राज्यातील तीन शहरे

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 11, 2024 01:24 PM IST

Swachh Survekshan Awards 2023 : भारतातील सर्वात स्वच्छ राज्य म्हणून महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे.

Mumbai
Mumbai (Reuters)

Swachh Survekshan Awards 2023 : भारत सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राला भारतातील सर्वात स्वच्छ राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगडचा क्रमांक आहे. स्वच्छ शहरांच्या यादीत इंदूरनं पहिलं स्थान कायम राखलं आहे, तर महाराष्ट्रातील तीन शहरांनी बाजी मारली आहे.

'सर्वात स्वच्छ शहर' या श्रेणीत मध्य प्रदेशमधील इंदूर आणि गुजरातमधील सुरत शहराला विजयी घोषित करण्यात आलं आहे. इंदूरनं सलग सातव्यांदा ही किमया साधली आहे. तर महाराष्ट्रातील सुनियोजित शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईनं तिसरं स्थान कायम राखलं आहे.

PMC Job : पुणे महापालिकेत मोठी भरती! मिळणार गलेलठ्ठ पगार; शिक्षणाची अट काय? वाचा!

सफाई कामगारांच्या सुरक्षेसाठी सर्वोत्तम व्यवस्था व सुविधा असलेल्या शहराच्या विभागात चंदीगडला पुरस्कार मिळाला आहे. या शहरानं सफाईमित्र सुरक्षित शहर पुरस्कार पटकावला आहे. ‘गंगा शहर’ श्रेणीमध्ये वाराणसीला सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२३ विजेत्यांना प्रदान करण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी आणि इतर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Pune Deccan traffic: श्रीराम वस्त्र पूजन सोहळ्यानिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल; अशी असेल व्यवस्था

स्वच्छ भारत मिशन-अर्बनअंतर्गत २०१६ मध्ये या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली. २०२३ च्या पुरस्कारांमध्ये ४,४१६ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, ६१ कॅन्टोन्मेंट आणि ८८ गंगा शहरांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, क्रमवारी निश्चित करताना १.५८ कोटी लोकांनी ऑनलाइन अभिप्राय दिले तर, १९.८२ लाख लोकांची प्रत्यक्ष भेटून मतं जाणून घेण्यात आली.

एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येचं सर्वात स्वच्छ शहर

सासवड (महाराष्ट्र)

पाटन (छत्तीसगड)

लोणावळा (महाराष्ट्र)

WhatsApp channel

विभाग