Karnataka Maharashtra crisis : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दिल्लीतील संसद भवनात अमित शहांच्या उपस्थितीत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि त्यांचे गृहमंत्री उपस्थित होते.
अमित शहा यांनी म्हटले की, महाराष्ट्र - कर्नाटकच्या सीमावादाच्या संपूर्ण प्रकरणात बनावट ट्विटर खात्यांनीही मोठी भूमिका निभावली आहे. काही सर्वोच्च नेत्यांच्या नावाने बनावट ट्विटर खाती तयार करून त्यावरून अफवा पसरवल्या गेल्या. हा प्रकार गंभीर यासाठी आहे की अशा प्रकारच्या ट्वीट्समुळे लोकांच्या भावना भडकवण्याचं काम होत आहे. त्यामुळे अशा बनावट खात्यांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल.
या बैठकीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपआपली बाजू मांडल्यानंतर अमित शाह यांनी दोन्ही राज्यांतील विरोधी पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन सामोपचाराने प्रश्न सोडवावा. सीमावादावरून राजकारण करू नये. त्याचबरोबर फेक ट्वीटचा मुद्दा या बैठकीत चर्चेला आला.
महाराष्ट्रातील एकही गाव कुठेही जाणार नाही,पण सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव,कारवार, निपाणीसहसीमाभाग मिळवण्याचा प्रयत्न करु,असं फडणवीस म्हटलं होतं. त्यावर फडणवीसांचं त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. कन्नड भाषिक बहुसंख्य असलेले अक्कलकोट आणि सोलापूर कर्नाटकात विलीन करावेत. कर्नाटकची एक इंच भूमी कोणाला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कर्नाटकची भूमी,पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये भूमी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असं ट्विट बोम्मई यांनी केलं होतं. बोम्मई यांच्या एका ट्विटवरून महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली होती ते ट्वीट अद्यापही बोम्मई यांच्या ओरिजिनल ट्विटरहँन्डलवर आहे.
बोम्मई यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट यासारखे कन्नड भाषिक भाग कर्नाटकात सामील व्हावेत, अशी आमची मागणी आहे. २००४ पासून महाराष्ट्र सरकार दोन्ही राज्यांमधील सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत आहे. परंतु आतापर्यंत त्यांना यश आले नाही. यापुढे ते होणार नाही. कायदेशीर लढा मजबूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत,असं बोम्मईंनी म्हटलं होतं.