Manoj Jarange News: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आंदोलनाला बसणार आहेत. यावेळी त्यांनी सामूहिक आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. जरांगे पाटील हे उद्या पत्रकार परिषद घेऊन सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची घोषणा करणार आहेत. यावेळी त्यांनी राज्य मंत्रीपदातून डावललेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याला मंत्रिमंडळात का घेतलं नाही याच्याशी आमचं काही देणं-घेणं नाही, असे ते म्हणाले.
महायुती सरकारच्या मंत्र्याचा काल शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली असून त्यांनी सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची घोषणा केली. त्यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, ज्यांना स्वतः च्या मनाने सामूहिक आमरण उपोषणाला बसायचे आहे, त्यांनाच उपोषणाला बसवले जाणार आहे. उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन घातलं जाणार नाही. आमरण उपोषणाला कोणी नाही जरी बसले तरी मी बसणार आहे, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. यावेळी जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतले नाही? हा आमचा प्रश्न नसून मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचे आम्हाला देणे घेणे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे जरांगे पाटील म्हणाले की, महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा, असे आवाहन त्यांनी केले. देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्याप्रमाणे मराठा आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी देखील जरांगे यांनी केली. दरम्यान, जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारला येत्या ५ जानेवारीपर्यंत अल्टिमेटम दिला होता. नाहीतर मराठा समाज पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचे त्यांनी इशारा दिला होता. सरकारला मराठा आणि कुणबी एक आहेत, हा मार्गी काढायचा आहे. अशा आम्ही आधीच सरकारकडे मागण्या केल्या आहेत. त्या सरकारने पूर्ण कराव्यात. नाहीतर सरकारला पुन्हा एकदा मराठ्यांना सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला होता. आता गुर्मीत आणि मस्तीत जगायचे नाही. जनतेने कौल दिला म्हणून नाटक करायचे नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्याआधी मंत्रिमंडळात स्थान न मिळल्याने त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. छगन भुजबळ म्हणाले की, मंत्रिपद कितीवेळा आले आणि कितीवेळा गेले, तरी भुजबळ संपला नाही, असेही छगन भुजबळ म्हणाले. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय आणि फेकले काय? त्याचा काय पडतो. ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला मोठे यश मिळाले. मात्र, अद्याप अजित पवारांची चर्चा झाली नसल्याचे त्यांनी म्हटले.
संबंधित बातम्या