London Rape case : लंडनमध्ये बदलापूरसारखं कांड! नराधमांपासून वाचण्यासाठी मुलींनी समुद्रात मारली उडी-maharashtra badlapur like incident in london two minor girls sexual assault in beach ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  London Rape case : लंडनमध्ये बदलापूरसारखं कांड! नराधमांपासून वाचण्यासाठी मुलींनी समुद्रात मारली उडी

London Rape case : लंडनमध्ये बदलापूरसारखं कांड! नराधमांपासून वाचण्यासाठी मुलींनी समुद्रात मारली उडी

Aug 21, 2024 04:08 PM IST

London Rape case : लंडनमध्येही बदलापूरसारखी घटना उघडकीस आली आहे. समुद्र किनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ करण्यात आला. एका टोळक्याने बीच वरील मुलींचा लैंगिक छळ केला.

लंडनमध्ये बदलापूरसारखं कांड! नराधमांपासून वाचण्यासाठी मुलींनी समुद्रात मारली उडी
लंडनमध्ये बदलापूरसारखं कांड! नराधमांपासून वाचण्यासाठी मुलींनी समुद्रात मारली उडी

London Rape case : महाराष्ट्रातील बदलापूरप्रमाणे लंडनमध्येही मुलींच्या लैंगिक छळाची घटना समोर आली आहे. समुद्र किनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. एक दोन नव्हे तर गुन्हेगारांच्या टोळक्याने मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे. आरोपींपासून वाचण्यासाठी मुलींना समुद्रात उडी मारावी लागली. यामुळे त्या बचवल्या. या प्रकरणी यूके पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. घटनेच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित असलेल्या लोकांनी आरोपींना ओळखण्यासाठी आणि साक्ष देण्यासाठी पुढे यावे, जेणेकरून त्यांना कठोर शिक्षा करता येईल, असे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची पुराव्याअभावी जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

डोरसेट पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १२ ऑगस्ट रोजी बोर्नमाउथ सी बीचवर घडली. १६ वर्षी वयोगटातील दोन किशोरवयीन मुली समुद्र किनारी आराम करत होत्या. दरम्यान, आरोपी त्यांच्या जवळ येऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करू लागले. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे दोन्ही मुली घाबरल्या आणि त्यांनी आरोपींवअसून वाचण्यासाठी समुद्रात उडी मारली. ही घटना घडली त्यावेळी समुद्रकिनाऱ्यावर मोठी गर्दी होती. मात्र, या मुलींच्या मदतीसाठी कुणीही आले नाही. मुलींनी आरोपींच्या तावडीतून कशीबशी सुटका केली. यावेळी त्यांनी थेट जवळच्या पोलिस ठाण्यात धाव घेत मदत मागितली.

साक्षीदार होण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन

पोलिस अधिकारी हेली लीच विल्किन्सन यांनी सांगितले की, एका २२ वर्षीय व्यक्तीला लैंगिक अत्याचारासाठी अटक करण्यात आली आहे. मात्र, पुराव्याअभावी त्याला जामीन देण्यात आला. पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की बॉर्नमाउथ बीचवर मुलींच्या लैंगिक अत्याचारात सामील असलेल्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. आरोपींना पकडता यावे आणि मुलींना न्याय मिळावा यासाठी पोलिसांनी घटनेच्या वेळी उपस्थित लोकांना आरोपीची ओळख पटवून साक्षीदार होण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

लीच-विल्किन्सन पुढे म्हणाले, “या घटनेत सहभागी असलेल्या इतर दोन लोकांची देखील ओळख पटली आहे परंतु, आम्ही या संदर्भात अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर जारी केला आहे जेणेकरून इतर आरोपींना लवकरात लवकर अटक करता येईल.

विभाग