मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nagpur: दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध ठेवणाऱ्या पित्याची हत्या, पोटच्या मुलीनेच दिली पाच लाखांची सुपारी
Crime (Representative use)
Crime (Representative use) (HT_PRINT)

Nagpur: दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध ठेवणाऱ्या पित्याची हत्या, पोटच्या मुलीनेच दिली पाच लाखांची सुपारी

25 May 2023, 22:32 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Nagpur Murder: नागपूर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत ३५ वर्षीय महिलेने जन्मदात्या पित्याची सुपारी देऊन हत्या केली.

Nagpur Crime: नागपूर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पोटच्या मुलीने जन्मदात्या पित्याची सुपारी देऊन हत्या केली. ही घटना १७ मे रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीसह अन्य तीन आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपी मुलीच्या वडिलांचे दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध सुरु होते. ज्यामुळे घरात वारंवार वाद होत असल्याने आरोपी मुलीने जन्मदात्या पित्याची हत्येसाठी पाच लाखांची सुपारी दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दिलीप सोनटक्के असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दिलीप हे भिवापूर येथील पेट्रोलपंपाचे मालक आहेत. तर, प्रिया माहुरताळे (वय, ३५) असे सुपारी दिलेल्या मुलीचे नाव आहे. दिलीप यांचे दुसऱ्या महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. यामुळे दिलीप त्यांची पत्नी, मुलगी आणि कुटुंबियातील इतर सदस्यांशी वाद घालायचे. या त्रासाला वैतागून प्रियाने वडिलांच्या हत्येची सुपारी दिली. त्यानुसार, प्रियाने शेख अफरोज उर्फ ​​इम्रान हनिफ (वय, ३३), मोहम्मद वसीम लाल मोहम्मद (वय, २१) आणि जुबेर खान (वय, २५) या तिघांना वडिलांना ठार करण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिली.

त्यानुसार, इम्रान हनिफ, मोहम्मद वसीम आणि जुबेर खान यांनी दिलीप यांच्या हत्येचा कट रचला. दरम्यान, १७ मे २०२३ रोजी नागपूर-नागभीड महामार्गावरील पेट्रोल पंपावर या तिघांनी दिलीप यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दिलीप यांचा मृत्यू झाला.

या घटनेच्या काही तासातच पोलिसांना तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. तसेच त्याची चौकशी केली असता दिलीप यांच्या मुलीनेच त्यांना ठार करण्याची सुपारी दिल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांना मृताच्या मुलीला ताब्यात घेतले. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.मृत दिलीप हे अनेकदा भिवापूर येथे राहणाऱ्या दुसऱ्या महिलेच्या नावे मालमत्ता हस्तांतरित करण्याची धमकी द्यायचे, यातूनच हा सर्व प्रकार घडला.

विभाग