फिगर मेंटेन करणं सोडा, ४-४ मुलं जन्माला घाला; महामंडलेश्वर प्रेमानंद महाराजांचं हिंदू महिलांना आवाहन
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  फिगर मेंटेन करणं सोडा, ४-४ मुलं जन्माला घाला; महामंडलेश्वर प्रेमानंद महाराजांचं हिंदू महिलांना आवाहन

फिगर मेंटेन करणं सोडा, ४-४ मुलं जन्माला घाला; महामंडलेश्वर प्रेमानंद महाराजांचं हिंदू महिलांना आवाहन

Updated Jul 26, 2024 02:28 PM IST

mahamandaleshwar premanand maharaj : महामंडलेश्वर प्रेमानंद महाराज यांनी हिंदू महिलांना जास्तीत जास्त मुलं जन्माला घालण्याचं आवाहन करताना वादग्रस्त विधान केलं आहे.

फिगर मेंटेन करणं सोडा, चार-चार मुलं जन्माला घाला; महामंडलेश्वर प्रेमानंद महाराजांचा हिंदू महिलांना सल्ला
फिगर मेंटेन करणं सोडा, चार-चार मुलं जन्माला घाला; महामंडलेश्वर प्रेमानंद महाराजांचा हिंदू महिलांना सल्ला

हिंदू महिलांनी आपली फिगर मेंटेन करण्याची काळजी सोडून द्यावी आणि चार-चार मुलं जन्माला घालावी,’ असा सल्ला पंचायती आखाडा श्री निरंजनीचे महामंडलेश्वर स्वामी प्रेमानंद महाराज यांनी दिला आहे. प्रेमानंद महाराज यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशातील उज्जैन इथल्या बडनगर रोडवरील मोहनपुरामधील श्री बाबाधाम मंदिरात (आर्जिवले हनुमान ८१ फूट) श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं महामंडलेश्वर स्वामी प्रेमानंद महाराज यांनी महिलांना हे सल्ले दिले.

धर्माच्या अनुषंगानं बिघडत चाललेल्या देशातील लोकसंख्येच्या मुद्द्याावर त्यांनी भाष्य केलं. 'भागवत कथेतील तुमच्या कानाला चांगल्या वाटतील, त्या गोष्टी सांगायला मी आलो नाही, तर सनातन धर्माला पुढं नेणाऱ्या गोष्टी सांगत आहे. सध्या सर्वजण सनातनचा झेंडा फडकावून हा धर्म पुढं नेण्याबद्दल बोलत असतात. मी याच बाबतीत तुम्हाला सावध करू इच्छितो, असं ते म्हणाले.

उत्तर प्रदेश हातातून गेलंय!

'उत्तर प्रदेशातील १७ जिल्हे आपल्या हातून गेले आहेत. पश्चिम बंगालमध्येही अशीच परिस्थिती आहे, तिथले लोकही याच आव्हानाचा सामना करत आहेत. आसाममधील ५ लाख लोकांकडे पासपोर्ट आणि व्हिसा नाही. २५ वर्षांपूर्वी ते लोक २ कोटी होते, नंतर ९ कोटी झाले आणि आता ३८ कोटी झाले आहेत. अजून वेळ गेलेली नाही. सावध व्हा, नाहीतर भारताचाही इंडोनेशिया होईल आणि लवकरच तुम्ही अल्पसंख्याक होऊन जाल, असा इशारा प्रेमानंद महाराज यांनी दिला.

महिलांनी धर्मासाठी काहीतरी केलं पाहिजे!

'आज सनातन संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी महिलांनी प्रत्येकी चार मुलांना जन्म देण्याची गरज आहे. हिंदू समाजातील स्त्रिया १ ते २ मुलं होऊ देण्यास कचरतात, तर इतर समाजातील महिलांना ८-८ मुलं होतात. हिंदू महिलांनी आपली फिगर राखण्याची काळजी करण्यापेक्षा सनातन धर्म आणि देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, असं प्रेमानंद महाराज म्हणाले.

आम्ही तुमच्या मुलांची काळजी घेऊ!

'जर तुम्हाला दोन मुलं हवी असतील आणि तुम्ही तिसऱ्या मुलाला जन्म दिला तर काळजी करण्याचं कारण नाही. तुमच्या तिसऱ्या मुलाची काळजी आम्ही घेऊ. इंडोनेशियामध्ये तिकिट काढून रामलीला पाहावी लागते. अनेक ठिकाणी देवाचं नाव घेतलं तर ते कापून फेकलं जातं. या सगळ्या संकटांचा आतापासूनच जागे होऊन विचार करावा लागेल, असं आवाहन त्यांनी केलं.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर