बेंगळुरूमधील महालक्ष्मी हत्या प्रकरणाबाबत सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. पतीने संशय व्यक्त केल्यानंतर आधी संशयाची सुई अशरफ नावाच्या व्यक्तीकडे फिरली. मात्र, नंतर या निर्घृण हत्येचा प्रत्येक दुवा उघडला गेला आणि मुख्य आरोपी मुक्ती रंजन रॉय पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सुमारे १८ दिवसांपासून महालक्ष्मीचा मृतदेह फ्रिजमध्ये पडून होता. आरोपींनी धारदार शस्त्राने मृतदेहाचे ५९ तुकडे केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी आणि मुक्ती रंजन जवळपास ६ महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, त्यांच्यात काहीही चांगलं चाललं नव्हतं. महालक्ष्मी आधीच विवाहित होती आणि पतीला सोडून वेगळी राहू लागली होती. मुक्ती आणि महालक्ष्मी यांच्यात वारंवार भांडणे होत असत. महालक्ष्मी व्यालिकवल भागात एका भाड्याच्या खोलीत रहात होती. दोघांमधील भांडणे कोणापासूनही लपून राहिली नव्हती. अनेकदा घराबाहेर त्यांचा ड्रामा चाललेला असायचा.
त्यांच्या भांडणाबाबत मल्लेश्वरम पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यांचे भांडण मिटवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ३ सप्टेंबरच्या रात्री मुक्ती रंजन महालक्ष्मीच्या फ्लॅटवर पोहोचला. महालक्ष्मी त्याला लग्नाबद्दल काहीतरी म्हणाली. यानंतर पुन्हा एकदा वाद सुरू झाला. महालक्ष्मीचा विवाह हेमंत दास यांच्याशी झाला होता आणि त्यांना एक मुलगीही आहे. अशरफ नावाच्या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून महालक्ष्मी आणि हेमंत सप्टेंबर २०२३ मध्ये विभक्त झाले होते.
मुक्ती रंजनला माहित होते की महालक्ष्मीचे आधी लग्न झाले होते. यामुळे त्याने तिच्याशी लग्नाला नकार दिला. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत. एकदा मुक्तीला महालक्ष्मीच्या फोनमध्ये दुसऱ्या एका व्यक्तीचा फोटो दिसला. महालक्ष्मीच्या वागणुकीबद्दल त्याने आपला धाकटा भाऊ स्मृती रंजन रॉय यालाही सांगितले होते. ते बेंगळुरू येथे राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महालक्ष्मीला खूप लवकर राग यायचा. स्थानिक पोलिस ठाण्यात मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली होती. असाच एक गुन्हा महालक्ष्मीचे पती हेमंत यांनी दाखल केला होता. पती हेमंत यांनी सांगितले होते की, महालक्ष्मी पैशांची मागणी करत होती. पैसे न मिळाल्याने तिने त्याला मारहाण केली. ३ आणि ४ सप्टेंबरच्या मध्यरात्री हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या भांडणानंतर मुक्ती रंजनने रागाच्या भरात तिची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार करत तो रात्रभर मृतदेहासोबत राहिला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावता येईल, याचा शोध त्यांनी गुगलवर घेतला.
दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ सप्टेंबर रोजी सकाळी मुक्ती रंजन भांड्यांच्या दुकानात गेला आणि तिथून धारदार चाकू घेऊन आला, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. सीसीटीव्हीमध्ये तो भांड्याच्या दुकानात जाताना दिसत होता. हत्येनंतर रंजनने आपला फोन बंद केला. त्याचा भाऊही मुक्ती रंजनच्या नंबरवर फोन करत होता पण संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर भावाला भेटल्यावर त्याने खुनाची माहिती दिली.
मुक्ती रंजनने आपल्या भावालाही कुठेतरी जाण्यास सांगितले. लहान भावाकडून पैसे घेऊन तो ओडिशाला गेला. पोलिसांनी मुक्ती रंजनचा मोबाइल पश्चिम बंगालमध्ये ट्रेस केला गेला. नेतर हा मोबाईल नंबर ओडिशामध्ये अॅक्टिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. मुक्तीने भावासमोर गुन्ह्याची कबुली दिल्याचेही पोलिसांना समजले.
२५ सप्टेंबर रोजी मुक्ती रंजन यांनी ओडिशातील भद्रक जिल्ह्यात राहत्या घराजवळ आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. तो मित्राची दुचाकी घेऊन गेला होता. मुक्ती रंजनने सुसाईड नोटमध्ये खुनाची कबुलीही दिली आहे. त्यांनी लिहिले की, 'मी महालक्ष्मीची हत्या केली आहे.पैशांची मागणी आणि सततच्या भांडणांमुळे तो वैतागला होता.