Viral News: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात जगभरातून लोक येत आहेत. भाविकांसह अनेक सेलिब्रिटी आणि एन्फ्लुएंसर देखील या महाकुंभात पोहोचले आहेत. महाकुंभात पोहोचलेले बहुतेक लोक आठवण म्हणून आपल्या मोबाईलमध्ये फोटो किंवा व्हिडिओ शूट करत आहे. परंतु, महाकुंभात एका तरुणीने चक्क स्नान करण्यासाठी जातानाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केल्याने नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडिओत संबंधित तरुणीने अंगावर फक्त टॉवेल गुंडाळल्याचे दिसत आहे.
@samuelina45 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पाच दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ७० लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे की, 'अश्लीलता पसरवणाऱ्या या लोकांना सांगायला हवे की, हा गोवा किंवा मालदीवचा समुद्रकिनारा नाही, हा प्रयागराज महाकुंभ आहे. लोक येथे पार्टी करायला नव्हेतर पवित्र गंगेत स्थान करण्यासाठी येतात.' दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, 'या समाजकंटकांनी श्रद्धेच्या महान कुंभ प्रयागराजमध्येही गोंधळ निर्माण केला आहे. महाकुंभात अशाप्रकारे रील बनवणाऱ्यांना बंदी घातली पाहिजे.' तिसऱ्याने लिहिले आहे की, 'पोलिसांनी या तरुणीविरोधात कारवाई करावी आणि महाकुंभ म्हणजे काय, हे समजावून सांगावे.' आणखी एका युजरने अशी कमेंट केली आहे. 'महाकुंभातही अश्लीलता पसरवली जात आहे का, सरकारने अशा लोकांना सूट दिली आहे का?'
संबंधित बातम्या