Mahakumbh Stampede Death Toll: प्रयागराज महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची अधिकृत आकडेवारी या घटनेनंतर सुमारे २० तासांनंतर प्रशासनाने जाहीर केली आहे. या दुर्घटनेत ३० भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यापैकी २५ जणांची ओळख पटली आहे. तर ९० हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयात ३६ जणांवर उपचार सुरू आहेत.
अनेकांचा आपल्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. कुंभ नगरचे डीआयजी वैभव कृष्णन यांनी सांगितले की, प्रचंड गर्दीमुळे बॅरिकेड तोडण्यात आले. त्यामुळेच चेंगराचेंगरी जाली व अनेक लोकांचा मृत्यू झाला .
महाकुंभ मेळ्याचे अधिकारी विजय किरण आनंद यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेल्या डीआयजींनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही, मात्र आखाडा मार्गावर रात्री दीडच्या सुमारास प्रचंड गर्दी असल्याचे त्यांनी सागितले. यामुळे झुन्सी परिसरात बॅरिकेड्स तोडण्यात आले आणि संगमाच्या दिशेने घुसलेल्या जमावाने तेथे आंघोळीची वाट पाहणाऱ्या लोकांना चिरडण्यास सुरुवात केली. आज व्हीआयपी प्रोटोकॉल नसल्याचेही डीआयजींनी स्पष्ट केले. हेल्पलाइनही सुरू करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेच्या काही तास आधी डीआयजींनी अपघाताचे वेगळेच कारण सांगितले होते. त्यावेळी डीआयजींनी सांगितले होते की, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार गर्दीचा दबाव वाढल्याने चेंजिंग रूमचे गेट गर्दीवर कोसळले. त्यानंतरच चेंगराचेंगरी झाली. मात्र, आता डीआयजींनी दिलेले कारणही मुख्यमंत्री योगी यांनी सकाळी दिले होते. बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे सीएम योगी म्हणाले होते.
प्रयागराज सेवा समितीचे निमंत्रक तीर्थराज पांडे बच्चा भैय्या यांच्या नेतृत्वाखाली संगम व कुंभमेळा परिसरातील तुळशी मार्गावर हे शिबिर सुरू आहे. संगमावर मध्यरात्री दोन वाजता अमृतस्नानाचा योग असल्याने बहुतांश भाविक तेथे जमले होते, अशी माहिती संघटनेचे सदस्य व भाविकांनी दिली आहे. भाविक ज्या ठिकाणी झोपले होते त्या शेजारचे बॅरिकेड्स तोडून भाविकांनी संगमाच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे झोपलेल्या भाविकांना जागे होण्याची संधीही मिळाली नाही. सर्वजण चिरडले गेले.
महानगरपालिका झोन ४ चे कक्ष अध्यक्ष तीर्थराज पांडे बच्चा भैय्या, भाजप नगरसेविका अनुपमा पांडे, त्यांची बहीण निरुपमा, सोनू त्रिपाठी अनिल पांडे यांनी जमावाचे रौद्र रुप व मृत्यूचे तांडव दोनदा जवळून पाहिले. सर्वांना १८ क्रमांकाच्या पुलावरून जाण्यास सांगण्यात आले. मध्यंतरी बाहेर पडण्याचा मार्ग नसल्याने लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले व मृतांचा आकडा वाढला.
संबंधित बातम्या