Viral Video: एका हातात मेकअप पाउच, दुसऱ्या हातात आरसा; महाकुंभात पत्नीला नटण्यात मदत करणाऱ्या पतीचा व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: एका हातात मेकअप पाउच, दुसऱ्या हातात आरसा; महाकुंभात पत्नीला नटण्यात मदत करणाऱ्या पतीचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: एका हातात मेकअप पाउच, दुसऱ्या हातात आरसा; महाकुंभात पत्नीला नटण्यात मदत करणाऱ्या पतीचा व्हिडिओ व्हायरल

Feb 03, 2025 01:55 PM IST

Mahakumbh Mela Viral Video: कुंभमेळ्यात आलेल्या पत्नीला नटण्यात मदत करणाऱ्या पतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

महाकुंभातील दाम्पत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
महाकुंभातील दाम्पत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Maha Kumbh 2025: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभात स्थान करण्यासाठी आलेल्या एका दाम्पत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यात एक संबंधित व्यक्ती आपल्या पत्नीला नटण्यास मदत करत आहे. आपल्या पत्नीसाठी त्याने एका हातात मेकअप पाउच आणि दुसऱ्या हातात आरसा पकडला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. 

सौंदर्या शुक्लाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक दाम्पत्य नदी किनाऱ्यावर गर्दीत उभे असल्याचे दिसत आहे. नवऱ्याच्या एका हातात आरसा आणि दुसऱ्या हातात मेकअप पाऊच आहे. तर, त्याची बायको मेकअप करत आहे. आजूबाजूला बरेच लोक आहेत, पण कशाचाही विचार न करता तो आपल्या पत्नीला नटण्यास मदत करत आहे.  हा व्हिडिओ पाहून लोकही खूप खूश झाले आहेत.

या व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी या दाम्पत्याचे कौतुक केले आहे. काही लोकांनी तर पतीला 'हस्बैंड ऑफ द इयर' ही उपाधीही दिली. एका युजरने लिहिले आहे की, 'हेच खरे प्रेम आहे.' काही मोठा दिखावा नाही, पण प्रत्येक दिवसातील छोटे-छोटे क्षणच प्रेमाला परिपूर्ण बनवतात. आणखी एकाने लिहिले की, जेव्हा तुमचा जीवनसाथी तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये साथ देतो, तेव्हा तीच खरी चॅम्पियनशिप असते. काहींनी तर आपले वैयक्तिक अनुभवही शेअर केले आहेत. एका महिलेने लिहिले की, ‘जेव्हा आम्ही बाहेर जातो, तेव्हा माझा नवरा हँडबॅग आणि पाण्याची बाटली धरतो. ही छोटी शी गोष्ट आहे, पण त्याचा खूप अर्थ आहे.’ तर काही लोकांनी मजेशीर अंदाजात कमेंटही केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘एक व्यक्ती आपल्या पतीचे कर्तव्य पार पाडत आहे.’

महाकुंभात बसंत पंचमीला ५ कोटींहून अधिक भाविक स्नान करतील असा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या संख्येने भाविक असूनही यंदा महाकुंभात गर्दी दिसत नाही. मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीतून धडा घेत यंदा महाकुंभमेळा प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. ऑपरेशन-११ लागू करण्यात आले आहे. प्रशासनाच्या उत्तम व्यवस्थापनामुळे अशा व्यवस्थेमुळे कोट्यवधी भाविकांचे आगमन होऊनही कुठेही गर्दी होत नसल्याचे बोलले जात आहे. दोन दिवसांपूर्वी महाकुंभात पोहोचलेल्या सीएम योगी आदित्यनाथ यांनी यावेळी कुठेही चूक होऊ नये, अशा कडक सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. सोमवारी बसंत पंचमीनिमित्त मुख्यमंत्री योगी स्वत: लखनौमधील वॉर रूममधून महाकुंभावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार महाकुंभातील शेवटचा अमृतस्नान सोहळा असलेल्या बसंत पंचमीला गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष योजना ऑपरेशन इलेव्हन राबविण्यात आली आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर