Mona Lisa Viral News: महाकुंभात मोती आणि रुद्राक्ष माळा विकण्यासाठी गेलेली मोनालिसा आपल्या सौंदर्यामुळे रातोरात चर्चेत आली. मोनालिसाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, मोनालिसाने अवघ्या १० दिवसांत १० कोटी रुपयांची कमाई केली, असा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावर मोनालिसाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मोनालिसाच्या प्रसिद्धीमुळे तिच्या व्यवसायात भर पडली असावी, असे अनेकांना वाटत असेल. पंरतु, खरी परिस्थिती काही वेगळीच आहे. मूळची इंदूरची असलेली मोनालिसाचे रत्यावर फिरणे देखील कठीण झाले आहे. एका इन्फ्लुएंसरशी बोलताना मोनालिसाचे वडील म्हणाले होते की, मुलीच्या अचानक प्रसिद्धीमुळे त्याच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. कारण बरेच लोक तिच्याकडून माळा विकत घेण्याऐवजी सेल्फीसाठी तिच्याकडे येतात.
सर्वसामान्य जनता असो किंवा महाकुंभातील युट्यूबर्स, मोनालिसासोबत फोटो काढायचा किंवा तिची मुलाखत घेण्यासाठी धडपड करत होते. या क्रेझमुळे महाकुंभात व्हायरल मुलीला अनेक समस्याला सामोरे जावा लागले. एक्सवरील अनेक व्हिडिओमध्ये मोनालिसाचा लोक पाठलाग करताना दिसत आहेत. त्यामुळे तिच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अखेर मोनालिसाला महाकुंभमेळ्यातून बाहेर पडावे लागले. आपल्या घरी पोहोचल्यानंतर मोनालिसाने ट्विटरवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, ‘मला माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या सुरक्षिततेसाठी इंदूरला परत जावे लागले. शक्य झाल्यास मी पुढच्या महाकुंभासाठी परत येईन.’
मौनी अमावस्यानिमित्त ईशान्य रेल्वे २८ ते ३१ जानेवारी दरम्यान प्रयागराज भागासाठी १५४ विशेष गाड्या चालवणार आहे. ही गाडी वाराणसी, भाटनी, गोरखपूर, अयोध्या धाम, छपरा, आझमगड, दोहरीघाट आणि गोमती नगर स्थानकातून प्रयागराज, रामबाग आणि झुसीपर्यंत धावणार आहे. यामध्ये परतीच्या प्रवासासाठी २८ आणि २१ जानेवारी रोजी २३ गाड्या धावणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी २९ आणि २४ जानेवारी रोजी एकूण २३ गाड्या धावणार आहेत. ३० जानेवारी रोजी एकूण २१ गाड्या सोडण्यात येणार असून परतीच्या प्रवासासाठी एकूण २१ गाड्या चालवण्यात येणार आहेत. ३१ जानेवारीरोजी एकूण ०७ गाड्या धावणार असून परतीच्या प्रवासासाठी एकूण १४ गाड्याही धावणार आहेत.
संबंधित बातम्या