Prayagraj Mahakumbh 2025 : प्रयागराज कुंभमेळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. महाकुंभाच्या पहिल्याच दिवशी जवळपास १ कोटीहून अधिक लोकांनी संगम घाटावर स्थान केले. दरम्यान एका साध्वीचा फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये लोक या साध्वीला ‘सर्वात सुंदर साध्वी’, 'महाकुंभमधील सर्वात सुंदर साध्वी' संबोधत आहेत.
प्रयागराजमध्ये सोमवारी सुरू झालेल्या महाकुंभमेळ्याच्या पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी गंगेत डुबकी मारली. गंगेच्या काठावर लाखो संतांनी आपल्या झोपड्या उभारल्या आहेत. विविध प्रकारचे साधू-संत आणि त्यांच्या जीवनशैलीचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे. दरम्यान, एका 'सुंदर साध्वी'चे फोटोही खूप व्हायरल होत आहेत. मात्र, तिची खरी ओळख काही वेगळीच आहे.
या सुंदर साध्वीची मुलाखत घेण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तिला गराडा घातला. ती देखील आपण साध्वी असल्याचे सांगत सुटली. मात्र काही युजरनी ती साध्वी नाही तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षा रिछारिया असल्याचे म्हटले आहे. आध्यात्मिक, धार्मिक विषयांवर व्हिडीओ पोस्ट करत असते. याशिवाय ती काही शो देखील होस्ट करते.
खरं तर ज्या साध्वीच्या सौंदर्याची इतकी चर्चा होत आहे, ती अँकर आणि ट्रॅव्हलर ब्लॉगर आहे. हर्षा रिचारिया असे तिचे नाव आहे. हर्षा इन्स्टाग्राम स्टार देखील आहे. हर्षाने आपल्या इन्स्टाग्राम बायोमध्ये सांगितले आहे की, ती उत्तराखंडची असून निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी कैलासानंदगिरी जी महाराज यांची शिष्या आहे. ती स्वत:ला 'हिंदू सनातन शेरनी' म्हणवते. हर्षाला इन्स्टाग्रामवर ७ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.
हर्षाचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल देखील आहे ज्यावर ती स्वतःला प्रवासी म्हणून वर्णन करते. हर्षाचे अनेक व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर खूप व्हायरल होत असतात. आता साध्वीच्या वेशातील तिचे फोटो खूप व्हायरल होत आहेत, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. अनेक जण तिचे जुने फोटोही सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.
हर्षा सध्या प्रयागराजमध्ये आहे. श्रद्धेने ओतप्रोत बुडालेल्या निरंजनी आखाड्याच्या संतांसोबत ती दिसत आहे. हर्षाच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून ती खूप धार्मिक आहे आणि अनेकदा हिंदू धर्माशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देते. एकीकडे मोठ्या कॉर्पोरेट फंक्शन्समध्ये अँकरच्या भूमिकेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही ती सहभागी होते.
संबंधित बातम्या