महिला नागा साधू कशा बनतात? मासिक पाळीच्या काळात गंगा स्नानासाठी अवलंबतात ‘ही’ अनोखी पद्धत
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  महिला नागा साधू कशा बनतात? मासिक पाळीच्या काळात गंगा स्नानासाठी अवलंबतात ‘ही’ अनोखी पद्धत

महिला नागा साधू कशा बनतात? मासिक पाळीच्या काळात गंगा स्नानासाठी अवलंबतात ‘ही’ अनोखी पद्धत

Jan 17, 2025 06:25 PM IST

Mahakumbh 2025 : नागा साध्वींचे गूढ जीवन आणि त्यांच्या साधनेचा खडतर प्रवास महाकुंभ २०२५ मधील लाखो भाविकांच्या गर्दीत पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

महिला नागा साधू
महिला नागा साधू

Mahakumbh 2025 Prayagraj : प्रयागराजमध्ये महाकुंभात मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर शाही स्नानाला सुरुवात झाली आहे. या पवित्र स्नानात १३ आखाड्यातील नागा साधू-साध्वी सहभागी झाले आहेत. लाखो भाविकांच्या गर्दीत नागा साध्वींचे गूढ जीवन आणि त्यांच्या साधनेचा खडतर प्रवास पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. पण महिला नागा साधू बनण्याची प्रक्रिया किती अवघड आणि आश्चर्यकारक आहे हे तुम्हाला माहित आहे का?

नागा साध्वी बनण्याचा मार्ग किती कठीण -

महिला नागा साधू होण्यासाठी कठोर तपश्चर्या तर करावी लागतेच, पण १० ते १५ वर्षे काटेकोर ब्रह्मचर्य पाळावे लागते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नागा साधू होण्यापूर्वी महिलेला जिवंत असतानाच पिंडदान करावे लागते. ही प्रक्रिया त्यांच्या जुन्या जीवनाचा त्याग आणि देवाला पूर्ण पणे शरण जाण्याचे प्रतीक आहे. यानंतर त्यांना मुंडन करून नदीत स्नान घातले जाते, जिथून त्यांचा आध्यात्मिक पुनर्जन्म होतो.

पुरुष नागा साधूंप्रमाणेच महिला नागा साध्वीदेखील भगवान शंकराची पूजा करतात. त्यांचे जीवन कठोर प्रथा आणि ब्रह्मचर्य नियमांनी बांधलेले असते. त्यांच्या अन्नात फक्त कंदमुळे, फळे, औषधी वनस्पती आणि पाने असतात. ते दिगंबर नाहीत, पण शिवलेले नसलेले भगवे कपडे घालतात.

मासिक पाळीदरम्यान साध्वी काय करते?

मासिक पाळीच्या काळात महिला साध्वी गंगेत स्नान करत नाहीत. त्याऐवजी ते स्वतःवर गंगेचे पाणी शिंपडतात, अंघोळीप्रमाणेत हे पाणी शिंपडणे व पाणी आचमन करणे पवित्र मानले जाते. नागा साध्वी होण्यासाठी केवळ साधना करणे आवश्यक नाही, तर आपल्या गुरूंचा विश्वास जिंकणे देखील आवश्यक आहे. सकाळी ब्रह्म मुहूर्तात शिवाचा जप आणि संध्याकाळी भगवान दत्तात्रेयाची पूजा करणे ही त्यांची साधना आहे. ते समाजापासून पूर्णपणे अलिप्त राहतात आणि कुंभमेळ्यासारख्या घटनांमध्येच त्यांच्या गूढ जीवनाची झलक जगाला पाहायला मिळते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर