चहावाल्या बाबाचा अनोखा हठयोग; तरुणांना देतात IAS ची शिकवणी, मात्र मौनव्रत धारण करून, ४० वर्षापासून खाल्ले नाही अन्न
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  चहावाल्या बाबाचा अनोखा हठयोग; तरुणांना देतात IAS ची शिकवणी, मात्र मौनव्रत धारण करून, ४० वर्षापासून खाल्ले नाही अन्न

चहावाल्या बाबाचा अनोखा हठयोग; तरुणांना देतात IAS ची शिकवणी, मात्र मौनव्रत धारण करून, ४० वर्षापासून खाल्ले नाही अन्न

Jan 10, 2025 05:39 PM IST

'चाय वाले बाबा' म्हणून ओळखले जाणारे दिनेश स्वरूप ब्रह्मचारी गेल्या ४० वर्षांपासून नागरी सेवेतील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देत आहेत.

चहा वाले बाबा
चहा वाले बाबा

प्रयागराजच्या महाकुंभात कोट्यवधी भाविक पवित्र स्नान करत असतानाच उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील एका चमत्कारिक व्यक्तिमत्त्वाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 'चाय वाले बाबा' म्हणून ओळखले जाणारे दिनेश स्वरूप ब्रह्मचारी गेल्या ४० वर्षांपासून नागरी सेवेतील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देत आहेत. या अद्भुत साधूचे आयुष्य केवळ दहा कप चहावर अवलंबून आहे आणि त्याचे शिक्षणाचे माध्यम व्हॉट्सअॅप आहे.

बाबांचे शिष्य राजेश सिंह म्हणतात, "गुरुजी गप्प बसतात, पण त्यांचे हावभाव आणि व्हॉट्सअ ॅप मेसेजद्वारे आम्हाला मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांना अधिकारी बनविणे हा त्यांचा उद्देश आहे. मौनाचे कारण विचारले असता ते लिहितात की, यामुळे ऊर्जेचा संचय होतो, ज्याचा उपयोग ते जगाच्या भल्यासाठी करतात. त्यांनी गेल्या ४० वर्षापासून भोजन केलेले नसून केवळ चहावर ते आयुष्य काढत आहेत.

दरम्यान, भगवान शंकराचे परमभक्त फ्रान्समधील पास्कल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. पास्कल यांनी प्रयागराज येथील महाकुंभ मेळा २०२५  मध्ये हजेरी लावलीआहे. ते म्हणाले, "मला इथे आल्याचा खूप आनंद होत आहे. हे पवित्र स्थान आत्म्याच्या शुद्धीसाठी आहे. मी अनेक योगी, साधू आणि हिंदू लोकांना भेटलो.

दर १२ वर्षांनी महाकुंभ भरतो, यावेळी ४५ कोटींहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत हा महाकुंभ होत आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती च्या संगमावर भाविक पापाचे प्रायश्चित करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी डुबकी मारतात. मकर संक्रांत, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमीला होणारे शाही स्नान हे मुख्य आकर्षण असते.

अदानींकडून दररोज १  लाख भाविकांना महाप्रसाद -

गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस (इस्कॉन) यांच्या सहकार्याने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात महाप्रसाद सेवेचे आयोजन केले आहे. या सेवेअंतर्गत १८ हजार सफाई कर्मचाऱ्यांसह दररोज सुमारे १ लाख भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. महाप्रसादात पोळी, डाळ, तांदूळ, भाजीपाला आणि मिठाईचा समावेश असेल. 

अदानी समूहाने गोरखपूरच्या गीता प्रेससोबत सुमारे एक कोटी आरती संग्रह पुस्तके छापण्यासाठी भागीदारी केली आहे. आरती संग्रहात शिव, लक्ष्मी, गणेश, विष्णू, दुर्गा आणि इतर देवी-देवतांना समर्पित भक्तिगीतांचा समावेश आहे. महाकुंभमेळ्यात या पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

महाकुंभमेळा ३० ते ४५ दिवस चालणार आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार आहे. १३  जानेवारीला पौष पौर्णिमा स्नान, १५ जानेवारीला मकर संक्रांत स्नान, २९ जानेवारीला मौनी अमावस्या स्नान, ३ फेब्रुवारीला बसंत पंचमी स्नान, १२ फेब्रुवारीला माघी पौर्णिमा स्नान आणि २६ फेब्रुवारीला महाशिवरात्री स्नान होणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर