लालू प्रसाद यांचे महाकुंभ मेळ्याबाबत वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, फालतू आहे कुंभ स्नान, याला काही अर्थ नाही..
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  लालू प्रसाद यांचे महाकुंभ मेळ्याबाबत वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, फालतू आहे कुंभ स्नान, याला काही अर्थ नाही..

लालू प्रसाद यांचे महाकुंभ मेळ्याबाबत वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, फालतू आहे कुंभ स्नान, याला काही अर्थ नाही..

Updated Feb 16, 2025 03:37 PM IST

Lalu Yadav On Mahakumb : लालू यादव यांनी ही घटना अत्यंत दु:खद असल्याचे म्हटले होते. रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. त्यांना कुंभमेळ्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, "अरे कुंभ, कुंभ मेळ्याला काही अर्थ आहे, फालतू आहे कुंभ

लालू प्रसाद यादव
लालू प्रसाद यादव

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर आपली प्रतिक्रिया देताना माजी रेल्वेमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी कुंभमेळ्याती स्नानाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकारण तापलं आहे.  रेल्वेच्या गैरकारभारामुळे चेंगराचेंगरी झाली आणि इतके लोक मृत्युमुखी पडले, असे लालू यादव यांनी आधी म्हटले. याची जबाबदारी घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा. त्यानंतर कुंभमेळाच फालतू असल्याचे लालू यादव म्हणाले. 

 एनडीएच्या घटक पक्षांनी राजद प्रमुखांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रभाकर मिश्रा आणि जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन यांनी लालू यादव यांना या दुर्घटनेवर राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. आरएलएमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी लालू यादव यांना वृद्ध संबोधत कायदेशीर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे लालू यादव यांना ट्रोलही केले जात आहे. या चेंगराचेंगरीची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे. नवी दिल्ली स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज सील करण्यात आले आहे.

तत्पूर्वी, लालू यादव यांनी ही घटना अत्यंत दु:खद असल्याचे म्हटले होते. रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. त्यांना कुंभमेळ्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, "अरे कुंभ, कुंभ मेळ्याला काही अर्थ आहे, फालतू आहे कुंभ 

लालूप्रसाद यांच्या या वक्तव्याला एनडीएने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रवक्ते प्रभाकर मिश्रा यांनी राबडी देवी छठ करताना गंगेत डुबकी मारत नाहीत का, असा सवाल केला आहे. त्यांचे कुटुंबीय काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जात नाहीत का? याच वर्षी त्यांचे लाखो अनुयायी कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी गेले होते. लालू यादव यांनी या सर्वांचा अपमान केला.

जदयूचे प्रवक्ते अरविंद निषाद यांनी लालू यादव यांच्यावर हल्ला चढवला आणि म्हटले की, लालू  रेल्वेमंत्री राहिले आहेत. त्यावेळी एक हजार जणांचा मृत्यू झाला होता. हा एक अपघात आहे ज्यावर राजकारण करणे चुकीचे आहे. रेल्वेसह हिंदू सभ्यता, संस्कृती आणि सनातनवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणे योग्य नाही.

राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख आणि राज्यसभेचे खासदार उपेंद्र कुशवाह यांनीही लालू यादव यांच्यावर मोठा हल्ला चढवला आहे. कुंभ हा कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. लालू प्रत्येक गोष्टीवर राजकारण करू पाहत आहेत. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना रेल्वेचे नियम आणि कायदे माहित आहेत. वयाच्या या टप्प्यावर त्यांच्या तोंडून काहीतरी बाहेर पडते. लालूजी जे बोलत आहेत त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला जाऊ शकतो.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर