Viral News: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. प्रयागराजमध्ये दूरदूरून साधू आणि संत येत आहेत. या महाकुंभात सहभागी होण्यासाठी केवळ देशातूनच नाही तर परदेशातूनही लोक आले आहेत. काही लोक व्हिडिओ बनवण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी तिथे पोहोचत आहेत. याच पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यासाठी आलेल्या साधूने युट्यूबरला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महाकुंभात मोठ्या संख्येत साधू संत पोहोचले आहेत, जे आकर्षण केंद्र बनले आहेत. या महाकुंभमेळ्यात एक असा साधू पोहोचला आहे, ज्यांनी गेल्या ९ वर्षांपासून आपला एक हात वर ठेवला आहे. या साधूची मुलाखत घेणे एका युट्यूबरला चांगलेच महागात पडले. मुलाखतीदरम्यान एक प्रश्न ऐकल्यानंतर हा साधू भडकले आणि आपल्या चिमट्याने त्याला मारहाण करू लागले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत साधू हे युट्यूबर विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरे देत आहे. मात्र, युट्यूबरने त्यांना आवडले नाहीत. राग अनावर झाल्यानंतर साधूने त्याला हातातील चिमट्याने मारहाण करू लागले. त्यानंतर युट्यूबर तिथून पळून गेला. त्यानंतर तिथे उपस्थित असलेला दुसरा व्यक्तीही तिथून निघून जातो. असे फालतू प्रश्न विचारायचे नाहीत, असे साधू व्हिडिओच्या शेवटी बोलताना ऐकू येत आहेत.
हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की, 'युट्यूबर साधूला त्रास दिला आहे. कुंभमेळ्याला भाविकांपेक्षा जास्त युट्यूबर्स पोहोचले आहेत.' दुसऱ्याने लिहिले की, 'साधू बाबाने योग्य काम केले आहे, यूट्यूबवर बरेच लोक महाकुंभमेळ्याच्या कव्हरेजसाठी सनातनी संतांना असंबद्ध प्रश्न विचारत आहेत, त्यांना असे मारहाण करायला हवी.'
संबंधित बातम्या