Maha Kumbh 2025 Viral Video: महाकुंभ २०२५ मध्ये अनेक बाबी व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून फुले विकणाऱ्या तरुणीचा, IIT सोडून साधू झालेल्या युवकाचा व साध्वी झालेल्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कुंभमेळ्याचे रील्स बनवण्यासाठी अनेक तरुण या ठिकाणी येत आहे. मात्र, एका तरुणाला रील्स तयार करणे अंगलट आले आहे. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कुंभ मेळ्यात रील्स तयार करण्यासाठी एक तरुण हा दुबईचा शेख बनून गेला. यावेळी तो रस्त्यावर फिरत असतांना त्यांच्या सोबत भयंकर घडलं. काही साधूंनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा तरुण अरबी शेखच्या वेशात कुंभमेळ्यात फिरत असल्याचं दिसत आहे. त्याच्यासोबत आणखी दोन तरुण आहेत, जे त्याचे अंगरक्षक असल्याचे भासवत आहेत. व्हिडिओ तयार करणारा तरुण त्याला विचारतो की कुंभमेळ्यात येऊन कसे वाटत आहे. यावर त्याने ठीक वाटत आहे असे उत्तर दिले. यानंतर त्याला त्याचे नाव काय? असा प्रश्न विचारला. यावेळी त्याच्यासोबत चालणाऱ्या दोन तरुणांनी त्याचे नाव शेख प्रेमानंद असून तो राजस्थानमधून आला असल्याचे सांगितले.
मात्र, या तरुणांची ही बाब कुंभमेळ्यातील साधूंना आवडली नाही. व्हिडिओ काढण्यासाठी हा तरुण मेळ्यात फिरत असल्याचे पाहून काही साधू भडकले. त्यांनी या तरुणाला घेराव घालत त्याला चांगलाच चोप दिला. व्हिडिओच्या पुढच्या भागात काही लोक त्या तरुणाला घेरून मारहाण करतांना दिसत आहे. यात काही साधू आणि भिक्षूही आहेत. हे लोक शेख तरुणाची पगडी काढून फेकून डेट असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. त्याचवेळी एका साधूने त्या तरुणाची कॉलर धरली आहे. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने लोक मारा असे देखील म्हणत आहेत. विशेष म्हणजे महाकुंभ २०२५ मध्ये मोठ्या संख्येने येत असून इथले अनेक व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. या तरुणाचा मार खातांनाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून, शेख बनून रील्स तयार करणे हा प्रकार या तरुणाच्या अंगलट आला आहे.
संबंधित बातम्या