माफिया डॉन मुख्तार अन्सारीचा गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. बांदा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या मुख्तारची तब्येत बिघडल्यानंतर त्याला वैद्यकीय महाविद्यालयत दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाला. प्रशासनाकडून त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार संपूर्ण उत्तर प्रदेश राज्यात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मऊ, गाजीपूर आणि बांदामध्ये सुरक्षा दलांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्तार अन्सारी यांची या आठवड्यात दुसऱ्यांदा तब्येत बिघडली होती. पहिल्यांदा चेकअप करून पुन्हा तुरुंगात पाठवले होते. गुरुवारी पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली. चेकअपमध्ये हार्ट अटॅकची शंका आल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेचून मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर मेडिकल कॉलेजला पोलीस छावणीचे रुप आले आहे. पोलीस अधिकारी रुग्णालय परिसरात पोहोचले आहेत.
वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने वेळोवेळी मुख्तार अन्सारीचे हेल्थ बुलेटिन जारी करून त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. २६ मार्च रोजी १६ तास अतिदक्षता विभागात ठेवल्यानंतर मुख्तारला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मुख्तारची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. तीन डॉक्टरांचे एक पॅनल तुरुंगात मुख्तारच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होतं.
तुरुंगात मुख्तार यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांचा भाऊ अफजल अन्सारीने आरोप केला की, त्यांना मारण्याचे षडयंत्र रचले होते. मुख्तारला मारण्याचा गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न केला जात होता. एकदा गाजीपूरमध्ये बॉम्ब बनवताना स्फोट झाला. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. दिल्ली पोलिसांनी आरोपीला पकडल्यानंतर त्याने कबूल केले होते की, मुख्तारला उडवण्यासाठी त्याला ५ कोटी रुपये मिळाले होते.
मुख्तार अन्सारीने वकील रणधीर सिंह सुमन यांच्या माध्यमातून न्यायालयत एक निवेदन दिले होते. त्यात म्हटले होते की, १९ मार्च रोजी जेवणातून त्याला विष दिले होते. भोजन केल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. हाता-पायासोबत संपूर्ण शरीरा वेदना होत आहेत. त्याने म्हटले की, ४० दिवसापूर्वीही त्याच्यावर विषप्रयोग झाला होता.
संबंधित बातम्या