Viral news : नैसर्गिक विधीसाठी बसलेल्या एका व्यक्तीवर १३ फुटी अजगराचा हल्ला! व्हिडिओ पाहून फुटेल घाम
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral news : नैसर्गिक विधीसाठी बसलेल्या एका व्यक्तीवर १३ फुटी अजगराचा हल्ला! व्हिडिओ पाहून फुटेल घाम

Viral news : नैसर्गिक विधीसाठी बसलेल्या एका व्यक्तीवर १३ फुटी अजगराचा हल्ला! व्हिडिओ पाहून फुटेल घाम

Published Jul 22, 2024 01:16 PM IST

Viral news : नैसर्गिक विधी करण्यासाठी बसलेल्या एका व्यक्तीवर तब्बल १३ फूट लांबीच्या अजगराने केला हल्ला. मध्य प्रदेशात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 नैसर्गिक विधीसाठी बसलेल्या एकावर तब्बल १३ फूट लांबीच्या अजगराने केला हल्ला! व्हिडिओ पाहून फुटेल घाम
नैसर्गिक विधीसाठी बसलेल्या एकावर तब्बल १३ फूट लांबीच्या अजगराने केला हल्ला! व्हिडिओ पाहून फुटेल घाम

Viral news : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये नैसर्गिक विधीसाठी बसलेल्या एका व्यक्तीवर तब्बल १३ फूट लांबीच्या अजगराने हल्ला केला. या अजगराने माणसाची मान घट्ट आवळली होती. तसेच त्याला गिळण्याचा देखील त्याने प्रयत्न केला. या थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्या व्यक्तीचा जीव कसा बसा वाचला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका गावात गावर शहारा आणणारी ही घटना घडली आहे. एक व्यक्ति हा शौचास बसला असतांना एका १३ फूट लांबीच्या अजगराने त्याच्यावर हल्ला करत त्याची मान आवळून त्याला गिळण्याचा प्रयत्न केला. यावेळी या व्यक्तीने अजगराचे तोंड पकडून सुमारे २० मिनिटे त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. यावेळी त्याने अजगराचे तोंड हाताने घट्ट पकडून ठेवले होते. तर अजगर मात्र, त्या व्यक्ती भोवती आवळलेला फास आणखी घट्ट करत होता. त्याला त्याची सुटका करता न आल्याने त्याने आरडा ओरडा केला. त्याचा आवाज ऐकून आजू बाजूचे नागरिक धावून आले. आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ तेथे पोहोचले असता त्यांना धक्का बसला. अजगराने त्या व्यक्तीला वेटोळे घातले असल्याचे दिसले. नागरिकांनी त्या व्यक्तीची सुटका करण्यासाठी अजगराला काठ्या, दांडक्याने मारहाण केली. तसेच अजगराला तलवारीने कापून ठार मारले. अजगराचे तुकडे करून तरुणाचे प्राण वाचवले. रविवारी या घटनेचा व्हिडिओ गावातील एका व्यक्तीने सोशल मीडियावर अपलोड केला. काही वेळातच हा व्हीडीओ व्हायरल झाला.

ही घटना जबलपूरच्या कुंडम तहसीलच्या बगराजी गावातील कल्याणपूर येथील असल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना १७ जुलै रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मांडला जिल्ह्यातून कल्याणपूरला लग्नाची मिरवणूक आली होती. राम सहाय हेही लग्नाच्या वरातीत आले होते. रोजच्या कामासाठी तो जंगलात गेला होता. तो नैसर्गिक विधीसाठी बसला असता, त्याच्यावर १३ फूट लांबीच्या अजगराने हल्ला केला.

अजगराला पकडलेल्या राम सहाय यांनी अजगराचे तोंड पकडून आरडाओरडा सुरू केला. अजगराने तरुणाच्या मानेपर्यंत जाऊन त्याला घट्ट पकडले होते. अजगराने तरुणाला गिळण्याचा प्रयत्न सुरू केला. तरुणाचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. लोकांनी कुऱ्हाडीसह अन्य धारदार शस्त्रांनी अजगराला कापून तरुणाचे प्राण वाचवले.

अजगराला कसे आटोक्यात आणायचे याची माहिती गावकऱ्यांना नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे तरुणीचा जीव वाचवण्यासाठी अजगराला मारावे लागले. इच्छा नसताना अजगराला मारल्याचेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांनी तसे केले नसते तर तरुणाची सुटका करणे कठीण झाले असते. हळुहळू अजगर तरुणाचा फास आवळत होता. थोडा उशीर झाला असता तर तरुणाला जीव गमवावा लागला असता. वनविभागाने पंचनामा करून अजगराला गावाबाहेर वनजमिनीत पुरले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर