woman doctor commits suicide : मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये एका फिजिओथेरपिस्ट डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रेमानंत झालेल्या विश्वासघातामुळे मुलीने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणीने ८ पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यामध्ये तिने प्रियकराने केलेल्या विश्वासघाताची संपूर्ण व्यथा मांडली होती. इतकेच नाही तर आत्महत्या करण्यापूर्वी तिने इंस्टाग्रामवर चार पोस्टही केल्या. यात तिने तिचे ८ पानी पत्र देखील उपलोड केले आहे. ज्यात तिने 'अलविदा मूर्ख जग आणि मूर्ख लोक. गुडबाय माझ्या प्रिय, मी तुझ्यासाठी माझे जीवन अर्पण केले. मी तुला म्हणाले होते की तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही. शेवटी तूच मला मारलेस.
मंदसौरच्या पिपलियामंडी नगरमधील डॉ. आशु मेघवाल या मुलीच्या मृत्यूनंतर तिचे कुटुंबीय संतापले आहे. गुरुवारी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांसह संतप्त कुटुंबीयांनी मुलीचा मृतदेह महामार्गावर ठेवून रास्ता रोको केला. कुटुंबीयांनी मुलीच्या आत्महत्येसाठी तिच्या प्रियकराला जबाबदार धरले असून त्याला तात्काळ अटक करून त्याच्या घरावर बुलडोझरने तोडण्याची मागणी केली आहे. तब्बल तासभर रस्त्यावर मृतदेह ठेवण्यात आला होता.
मृत मुलीने नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला होता आणि सध्या ती फिजिओथेरपिस्टचा कोर्स करत होती. तिने मृत्यूपूर्वी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एका पोस्टमध्ये वडिलांना उद्देशून २ पानी पत्र लिहून माफी मागितली आहे. त्याने लिहिले- 'मला माफ करा पापा'. तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने जितेंद्र नागडा यांच्यावर प्रेमात फसवणूक केल्याचा आरोप केला आणि तिसऱ्या पोस्टमध्ये तिने तिच्या प्रियकरासोबतचे १० फोटो उपलोड केले आहे. जितेंद्र नागडा हा वकील असून टु मंदसौरमध्ये प्रॅक्टिस करतो.
मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, दोघेही बरेच दिवस लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, परंतु मुलाने ५ महिन्यांपूर्वी दुसऱ्या मुलीशी लग्न केले. लग्नानंतर दोघेही वेगळे झाले. काही दिवसानंतर जितेंद्र पुन्हा डॉक्टरत रुणीला भेटला. त्याने कुटुंबाच्या आनंदासाठी व त्यांच्या दाबावामुळे दुसऱ्या तरुणीशी लग्न केल्याचे कबूल केले. मी माझ्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करीन असे आश्वास देखील त्याने तरुणीला दिले होते. गेल्या सोमवारी दुपारी ३ ते ८ वाजेपर्यंत दोघेही सोबत राहिले, मात्र अचानक जितेंद्रचा लहान भाऊ आला आणि शिवीगाळ करू लागला. यावेळी त्याने अनेक आरोप केले. दरम्यान, या वरुण जितेंद्र आणि मृत मुलीच्या कुटुंबीयांचे वाद होऊ लागले. दरम्यान, जितेंद्रने पुन्हा तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यामुळे तरुणी दुखावली गेल्याने तिने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळलं.
मुलीच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, तरुणाचे वडील यापूर्वी दोनदा त्यांच्या घरी आले होते आणि त्यांना धमकावले होते. घरी आल्यानंतरही त्यांनी आम्हाला धमकावने सुरूच ठेवले. यादरम्यान मुलीने मुलाच्या वडिलांना आणि भावाला कोण खोटे बोलत आहे आणि कोण कुणाला फसवत आहे असे उत्तर दिले. दरम्यान, मुगली ही तिच्या मित्रांसह मुलाच्या घरी गेली. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब घरी बसले होते. मुलगी म्हणाली की तू माझ्याशी लग्न करण्याचे वचन दिले आहेस, आता तुझ्या वडिलांसमोर तेच बोल. जितेंद्रने तिला शिवीगाळ करत लग्नास नकार दिला. त्याने मुलीकडून खूप पैसेही घेतले होते. दरम्यान, मुलीला धक्का बसल्याने तिने आत्महत्या केली.
पिपलिया मंडी चौकीचे प्रभारी कपिल सौराष्ट्रीय यांनी सांगितले की, मुलीच्या सुसाईड नोटच्या आधारे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. जितेंद्र नागडा मंदसौरमध्ये वकिली करतात. चार-पाच महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. दोघांमध्ये अफेअर होते. तपासात त्याचे वडीलही दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.