मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ujjain News: उज्जैनमध्ये क्रिकेट सट्टेबाजीचं मोठं रॅकेट उघड! करोडोंची रोकड सापडली; सात देशांच्या चलनी नोटा

Ujjain News: उज्जैनमध्ये क्रिकेट सट्टेबाजीचं मोठं रॅकेट उघड! करोडोंची रोकड सापडली; सात देशांच्या चलनी नोटा

Jun 14, 2024 02:59 PM IST

Ujjain ipl T20 cricket satta : उज्जैनमध्ये क्रिकेट सट्टेबाजीचे मोठं नेटवर्क उघडकीस आलं आहे. पोलिसांनी छापा टाकून ९ जणांना ताब्यात घेतलं आहे. घटनास्थळी कोट्यवधी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मशीनच्या सहाय्याने नोटांची मोजणी करण्यात आली.

उज्जैनमध्ये क्रिकेट सट्टेबाजीचं मोठं रॅकेट उघड! करोडोंची रोकड सापडली; सात देशांच्या चलनी नोटा
उज्जैनमध्ये क्रिकेट सट्टेबाजीचं मोठं रॅकेट उघड! करोडोंची रोकड सापडली; सात देशांच्या चलनी नोटा

Ujjain ipl T20 cricket satta : उज्जैनमध्ये क्रिकेट सट्टेबाजीचं मोठं नेटवर्क उघडकीस आलं आहे. पोलिसांनी छापा टाकून ९ जणांना ताब्यात घेतलं आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी पियुष चोप्रा हा फरार होण्यास यशस्वी झाला आहे. घटनास्थळावर पोलिसांना कोट्यवधी रुपयांची रोकड सापडली आहे. यात तब्बल ७ देशांच्या चलनी नोटा देखील जप्त करण्यात आल्या आहेत. रोख मोजण्यासाठी मशीन मागवावी लागली असून पोलिस रोख मोजण्याचे काम करत आहेत. पोलीस मुख्य आरोपीच्या शोध घेत आहेत. आरोपी देश सोडून फरार होऊ नये यासाठी लुकआउट नोटिस जारी करण्यात आली आहे.

NEET 'पेपर लीक' प्रकरणाच्या सीबीआय तपासासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज, सरकार आणि NTA ला दिली नोटीस

उज्जैनचे एसपी प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, पीयूष चोप्रा मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजीचे रॅकेट चालवत होता. या बाबत ठोस माहिती मिळाल्यावर गुरुवारी रात्रीपासून उज्जैनमध्ये पोलिसांनी २ ते ३ ठिकाणी छापे टाकले. प्रदीप शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, खारा कुआ पोलिस स्टेशन हद्दीतील मुसद्दीपुरा आणि नीलगंगा पोलिस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या परिसरात कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळावरून कोट्यवधी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. तब्बल १४.५८ कोटी भारतीय चलन घटनास्थळी सापडले असून विदेशी नोटांची मोजणी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.

Mumbai Rains: मुंबईत पावसामुळे अनेक भागांत वाहतूक कोंडी, संतापलेल्या प्रवाशांनी शेअर केले फोटो

११ पोत्यांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते १४ कोटी रुपये

छाप्यादरम्यान पोलिसांनी ४१ मोबाईल फोन, १९ लॅपटॉप, ५ मॅक-मिनी, १ आयपॅड, भारतीय आणि विदेशी सिमकार्ड, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आदी साहित्य जप्त केले आहेत. आरोपींकडून नोट मोजण्याचे मशीनही जप्त करण्यात आले आहे. या नोटा फरार आरोपी पियुषच्या मुसद्दीपुरा येथील राहत्या घरी ११ पोत्यांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. अमेरिका, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती, नेपाळसह ७ देशांचे चलन जप्त करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी पियुष हा देखील बांधकाम व्यावसायिक आहे. दरम्यान, तो कुटुंबासह लॅटव्हियाला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. या साठी लुकआउट नोटिस जारी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात रोकड जप्त झाल्याची माहिती पोलिसांनी ईडी आणि आयकर विभागलाही दिली आहे.

WhatsApp channel
विभाग