Viral News : रील बनवण्याच्या नादात घेतला गळफास! तडफडू लागल्यावर मित्र म्हणाले 'नाटक'; अल्पवयीन मुलाचा करुण मृत्यू
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : रील बनवण्याच्या नादात घेतला गळफास! तडफडू लागल्यावर मित्र म्हणाले 'नाटक'; अल्पवयीन मुलाचा करुण मृत्यू

Viral News : रील बनवण्याच्या नादात घेतला गळफास! तडफडू लागल्यावर मित्र म्हणाले 'नाटक'; अल्पवयीन मुलाचा करुण मृत्यू

Published Jul 21, 2024 01:52 PM IST

Viral News : रील्सच्या नादात एका मुलाने स्वत:ला गळफास घेतला. मात्र, त्याचा फास आवळल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

रील बनवण्याच्या नादात घेतला गळफास! तडफडू लागल्यावर मित्र म्हणाले 'नाटक'; अल्पवयीन मुलाचा करुण मृत्यू
रील बनवण्याच्या नादात घेतला गळफास! तडफडू लागल्यावर मित्र म्हणाले 'नाटक'; अल्पवयीन मुलाचा करुण मृत्यू

Viral News : आजची तरुणाई रील्स, सोशल मीडियाच्या प्रवाहात वाहावत चालली आहे. व्हिडिओ तयार करण्याच्या नादात अनेकांचा जीवही गेला आहे. नुकताच मुंबई येथील एका सोशल मीडिया स्टार सीए असलेल्या तरुणीचा असाच व्हीडीओ तयार करण्याच्या नादात दरीत कोसळून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतांना मध्य प्रदेशातील मुरैना येथे एका ११ वर्षाच्या मुलाचा रील बनवण्याच्या नादात मृत्यू झाला यह . सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रील तयार करण्यासाठी एका मुलाने गळ्यात दोरीचा फास घातला. मात्र, हा फास गळ्याभोवती आवळल्याने त्याचा मृत्यू झाला. विद्यार्थी हा गळ्यात फास लावून रील बनवत होता. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अंबा येथे घडली. करण परमार (वय ११) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. करण हा लेन रोडवरील मोकळ्या जागेवर इतर मुलांसोबत खेळत होता. दरम्यान, रील काढण्यासाठी त्याने गळफास घेतला. मात्र, गळ्याभोवती फास आवळल्याने तो तडफडू लागला. यावेळी त्याचे मित्रही तेथे होते. त्याला त्यांनी तडफडतांना पाहिले. मात्र, तो नाटक करत असल्याचे सर्वांना वाटले. आणि त्यांनी त्याचा व्हिडिओ तयार केला. जीव गुदमारल्याने काही वेळातच करण बेशुद्ध झाला. हे पाहून मुले त्याच्याजवळ पोहोचली. तो हलत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मुले पळून गेली. ज्या मुलाने व्हिडिओ बनवला तोही त्याचा मोबाईल तिथेच टाकून पळून गेला.

या घटनेची माहिती मिळताच करणच्या कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठले. त्याने त्याला फासातून काढले. व त्याला थेट रुग्णालयात नेले, मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच अंबा पोलिसांनीही सिव्हिल हॉस्पिटल गाठले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पीएम हाऊसमध्ये ठेवण्यात आला असून, रविवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

मृत करण परमार हा इयत्ता सातवीत शिकत होता. शनिवारी शाळेतून परतल्यानंतर ते लेन रोडवरील घरासमोरील मोकळ्या भूखंडावर खेळण्यासाठी गेले होते. गळ्यात फास घेऊन फाउंडेशनच्या वर उभ्या असलेल्या भिंतीवर उभा असताना तो व्हिडिओ बनवत होता, असे सांगितले जात आहे. त्यानंतर त्याचा पाय घसरला आणि दोरी ओढली, त्यामुळे त्याला फास बसून त्याचा मृत्यू झाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर