Nephew Attacks Aunty In Madhya Pradesh: मध्य प्रदेशच्या ग्वालियर येथे धक्कादायक घटना घडली, जिथे एका महिलेचे स्वत:च्या पुतण्यासह प्रेमसंबंध सुरु होते. मात्र, या दोघांत तिसऱ्याने एन्ट्री केल्याने संतापलेल्या पुतण्याने तिचा गळा चिरला. या घटनेनंतर आरोपी पुतण्या फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध सुरु होते. मात्र, काही दिवसानंतर संबंधित महिला दुसऱ्या व्यक्तीशी फोनवर बोलत असल्याची आरोपीला माहिती मिळाली. हे आरोपीला सहन झाले नाही. त्याने महिलेला कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत कोणालाही माहिती नसल्याने दोघेही एकत्र घराबाहेर पडायचे. दरम्यान, शुक्रवारी आरोपी महिलेला घेऊन आनंद नगर येथे गेला. यानंतर आरोपीने महिलेचा गळा चिरला. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
संबंधित महिला दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असल्याचा आरोपीला संशय आला. यानंतर आरोपी महिलेला आनंदनगर येथील त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला. तिथे तो महिलेशी बोलत होता. परंतु, काहीवेळाने महिलेचा किंचाळण्याचा आवाज आल्याने त्याचा मित्र घटनास्थळी पोहोचला. त्यावेळी महिलेचा गळ्यातून रक्त येत असल्याने तिचा गळा चिरल्याचे त्याला समजले. त्याने त्वरीत महिलेला रुग्णालयात घेऊन गेला. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ज्या पुतण्यासोबत महिलेचे प्रेमसंबंध होते, तो तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या पुतण्याला तिचे दुसऱ्या व्यक्तीशी बोलणे आवडले नाही. यामुळे रागाच्या भरात त्याने महिलेचा गळा चिरला. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.