MP Jailer Starts Making Fake Notes After Release: मध्य प्रदेशातून सगळ्यांना हैराण करणारी माहिती समोर आली. एका ३५ वर्षीय व्यक्तीने तुरुंगात प्रिंटिंग शिकून त्यानंतर सुटकेनंतर नोटा छापायला सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली.आरोपीकडून २०० रुपयांच्या ९६ नोटा जप्त केल्या, अशी महिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूपेंद्रसिंह धकत असे आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या घरातून एक कलर प्रिंटर, बनावट नोटा बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईच्या सहा बाटल्या आणि कागद जप्त करण्यात आले. आरोपीने गेल्या काही महिन्यांपासून बनावट नोटा छापून जिल्ह्याच्या बाजारपेठेत फिरवत असल्याची कबुली दिली. आरोपीवर हत्येसह ११ गुन्हेगारी गुन्ह्यांची नोंद आहे.
तुरुंगात असताना आरोपीने एका व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमात नोटा छापण्याची कला आत्मसात केली. त्यानंतर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आरोपीने पैसे कमवण्यासाठी नोटा छापण्यास सुरुवात केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी आरोपीची चौकशी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
तेलंगाणातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. घरात शिरलेल्या चोरांना मायलेकींनी चांगलाच धडा शिकवला आहे. मायलेकींनी शौर्य दाखवत दोन आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.