Viral News: अनेक लहान मुलांना कोलांची उडी मारायला खूप आवडते. मात्र, असे करणे किती धोकादायक ठरू शकते, त्याचे उदाहरण देणारी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली. ब्लँकेटच्या ढिगाऱ्यावर कोलांटी उडी मारताना एका तरुणाच्या मानेचे हाड मोडले आणि त्याला गंभीर दुखापत झाली. सहा दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
राकेश गरासिया (वय, १८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो नीमच जिल्ह्यातील रामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भडाना गावात वास्तव्यास होता. तो घरोघरी जाऊन ब्लँकेट विकण्याचा त्याचा व्यवसाय होता. तो गेल्या महिन्यात आपल्या ओळखीच्या आणि गावातील लोकांसोबत व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्रात आला होता. तो सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील बेलापूर येथे आपल्या लोकांसोबत राहत होता.
दरम्यान, १३ डिसेंबर रोजी सकाळी तो सहकाऱ्यांसमोर घराबाहेर बसलेला असताना बँकेटवर कोलांटी उडी मारत होता. पहिल्या कोलांटी उडी मारल्यानंतर त्याला मजा वाटली. मग त्याने दुसऱ्यांदा जवळ असलेल्या ब्लँकेटचा ढिगारा करून त्यावर उडी मारण्याचे ठरवले. मात्र, त्यानंतर त्याने मारलेली कोलांटी उडी त्याच्या आयुष्यातील शेवट करणारी ठरली. ब्लँकेटच्या ढिगाऱ्यावर उडी मारताना त्याच्या मानेचे हाड मोडले आणि शांतपणे जमीनीवर पडला. सुरुवातीला सहकाऱ्यांना वाटले की, तो गंमतीने झोपला आहे. पण तो लवकर न उठल्याने सहकाऱ्यांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले, तिथे सहा दिवस उपचार सुरू असताना १८ डिसेंबर २०२४ रोजी त्याचा मृत्यू झाला.
गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास नीमचच्या भडाना गावात या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरातील तरुण मुलाच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात मोठा भाऊ आणि आजारी आई- वडील आहेत. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने राकेशने लहानपणापासूनच कामाला सुरुवात केली. प्रशासनाने पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी बंजारा समाजाचे नेते सागर कच्छावा यांनी केली आहे.