मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Digvijay Singh Fell: भारत जोडो यात्रेत धक्काबुक्की; दिग्विजय सिंह पडले! पाहा व्हिडिओ

Digvijay Singh Fell: भारत जोडो यात्रेत धक्काबुक्की; दिग्विजय सिंह पडले! पाहा व्हिडिओ

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Nov 26, 2022 02:42 PM IST

digvijay singh Digvijay Singh fell down: मध्य प्रदेशातील भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या धक्काबुक्कीचा फटका माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना बसला आहे.

Digvijay Singh
Digvijay Singh (Congress Twitter)

digvijay singh Digvijay Singh fell down in Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. महाराष्ट्रातून ही यात्रा आता मध्य प्रदेशात पोहोचली असून तिथंही हजारो लोक यात्रेत सहभागी होत आहेत. त्यामुळं धक्काबुक्कीच्या घटनाही घडत आहे. यात्रेतील या गर्दीचा फटका मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना बसला आहे.

भारत जोडो यात्रेचा मध्य प्रदेशातील आज चौथा दिवस आहे. यानंतर राहुल हे आपल्या टीमसह राजस्थानमध्ये दाखल होणार आहेत. मध्य प्रदेशातील पदयात्रेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दिग्विजय सिंह हे यात्रेत सहभागी होऊन राहुल गांधींसोबत पायी चालताना दिसले. राहुल गांधींची यात्रा आज ओंकारेश्वरहून इंदूरकडे निघाली होती. बरवाहपासून चार किमी अंतरावर चोर बावडीजवळ एका हॉटेलमध्ये राहुल गांधी अचानक चहासाठी थांबले. त्यावेळी तिथं चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी गर्दीत धक्का लागून दिग्विजय सिंह जमिनीवर कोसळले. काही कार्यकर्तेही त्यांच्या अंगावर पडले. त्यामुळं मोठा गोंधळ उडाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी व सोबत असलेल्या पोलिसांनी त्यांना आधार देऊन उठवले. दिग्विजय सिंह यांना कुठलीही गंभीर दुखापत झालेली नाही. त्यांची तब्येत बरी उत्तम असून ते यात्रेतील पुढचा प्रवासही करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर दिग्विजय सिंह यांनीही नाराजी व्यक्त केली.

राहुल यांची भारत जोडो यात्री आज खरगोन जिल्ह्यातील मनिहार, बलवाडा मार्गे महूला पोहोचेल. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला राहुल भेट देणार आहेत. यानंतर ते एका सभेला संबोधितही करतील. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री कमलनाथ, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासह देशातील आणि राज्यातील सुमारे ४० नेते उपस्थित राहणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग