Viral Video : सोशल मिडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असतं. मध्य प्रदेशातील दमोहा येथील तेंदुखेडा गावातील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. एका भल्या मोठ्या अजगरानं एका कोल्ह्याची शिकार करत त्याला सावज बनवलं आहे. एवढेच नाही तर अजगराच्या तोंडापेक्षा कितीतरी मोठा असलेल्या असजगरने त्याला गिळलं. या घटनेचा व्हिडिओ ग्रामस्थांनी काढला असून तो सोशल मिडियावर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
दमोह (मध्य प्रदेश) पावसाळ्यात अनेक ठिकाणी साप पाहायला मिळतात. या ठिकाणी अजगर देखील आहेत. दमोह येथील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तब्बल १२ फुट लांब अजगराने जिवंत कोल्ह्याला गिळलं आहे. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी अजगराचा व्हिडिओ बनवला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दमोह जिल्ह्यातील तेंदुखेडा आणि नारगुनवा दरम्यानच्या भोंडीमाळ गावात १२ फूट लांबीच्या अजगराने जिवंत कोल्हा गिळल्याची घटना आज सकाळी १२ च्या सुमारास घडली, जेव्हा शेतकरी त्यांच्या शेतात काम करत असताना त्यांना कोल्ह्याचा ओरडण्याचा आवाज आला. शेतकऱ्यांनी आवाज ऐकला आणि त्यांना वाटले की जंगलात कोल्हा शिकार करत असेल. परंतु जेव्हा त्यांनी कोल्ह्याचा ओरडण्याचा आवाज ऐकला तेव्हा शेतकरी आवाजाच्या दिशेने गेले, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. तब्बल १२ फूट लांबीचा अजगर कोल्ह्याला जीवंत गिळतांना शेतकऱ्यांनी पाहिले. या घटनेचा व्हिडिओ एका शेतकऱ्याने काढला असून त्याने तो सोशल मिडियावर अपलोड केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अजगर जेव्हा कोल्हाला जिवंत गिळत होता तेव्हा शेजारी उभे असलेले शेतकरी बोलत असतांना हा व्हिडीओ बनवला आहे. काही वेळात अजगराने संपूर्ण कोल्ह्याला जिवंत गिळले. कोल्ह्याचा श्वास गुदमरल्याने त्याचा काही वेळाने मृत्यू झाला. त्यामुळे अजगराला कोल्हा गिळायला आणखी सहज गेले.
गावकऱ्यांनी सांगितले की, कोल्हा गिळल्यानंतर अजगराला नीट चालताही येत नव्हते आणि तो अजगर बराच वेळ तसाच पडून होता आणि मग हळूहळू जंगलात निघून गेला.