Viral Video: रेल्वे पोलीस स्थानकात एका महिलेसोबत गैरवर्तन, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले-madhya pradesh dalit woman teen son thrashed by railway police ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: रेल्वे पोलीस स्थानकात एका महिलेसोबत गैरवर्तन, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

Viral Video: रेल्वे पोलीस स्थानकात एका महिलेसोबत गैरवर्तन, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

Aug 29, 2024 01:43 PM IST

Madhya Pradesh Railway Police Viral Video: रेल्वे पोलीस स्थानकात पोलिसांनी एक महिला आणि तिच्या मुलाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मध्य प्रदेशात रेल्वे पोलिसांकडून महिलेला बेदम मारहाण
मध्य प्रदेशात रेल्वे पोलिसांकडून महिलेला बेदम मारहाण (@JituPatwari (X))

Woman Thrashed by Railway Police: मध्य प्रदेशातील कटनी येथील सरकारी रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये एक महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विविध सोशल मीडिया ग्रुपवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात रेल्वे पोलीस स्थानकात एक महिला आणि एका अल्पवयीन मुलाला मारहाण होताना दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांना अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही. संबंधितव्यक्तीने तक्रार नोंदविल्यास वस्तुस्थितीच्या आधारे तपास केला जाईल’, असे त्यांनी सांगितले. हे प्रकरण जीआरपी कटनीचे आहे. जीआरपी कटनी स्टेशन इन्चार्जला हटवण्यात आले असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश ही देण्यात आले आहेत, अशी माहिती जीआरपीचे पोलिस अधीक्षक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ऑक्टोबर २०२३ चा असल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओत दिसणारे लोक गुन्हेगार दीपक वांस्कर यांचे नातेवाईक आहेत. दीपक वांसकर याच्याविरोधात जीआरपी पोलीस स्टेशन कटनीमध्ये १९ गुन्हे दाखल आहेत. दीपक वांस्कर यांच्यावर २०१७ पासून पाळत ठेवण्यात आली आहे. गेल्या वर्षी चोरीच्या गुन्ह्यात फरार झाल्यानंतर १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. यावर्षी एप्रिल महिन्यात त्याला कटनी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले होते.

मध्य प्रदेश पोलिसांचे स्पष्टीकरण

मध्य प्रदेश पोलिसांनी एक्सवर पोस्ट केली की, ‘जीआरपी स्टेशन कटनीमधील गैरवर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला. हा व्हिडिओ ऑक्टोबर २०२३ चा आहे. ही घटना लक्षात येताच स्टेशन इन्चार्जची जीआरपी पोलीस लाइन जबलपूर येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयाने डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्याला कटनी येथे जाऊन घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.’

काँग्रेसची सरकारवर टीका

या घटनेवर प्रतिक्रिया देताना मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जीतू पटवारी म्हणाले की, ‘कायद्याच्या किंवा राज्यघटनेच्या वर असलेल्या पोलिसांच्या छोट्या-मोठ्या प्रतिनिधींनी पुन्हा एकदा एका दलित कुटुंबासोबत असे कृत्य केले. दलित अत्याचार हे सर्वात मोठे हत्यार बनले आहे. सरकार दलित आणि आदिवासी कुटुंबावर अत्याचार करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. राजकीय द्वेषाचा हा खेळ थांबला पाहिजे.’

विभाग