madhya pradesh crime: मध्य प्रदेशातील इटलाम जिल्ह्यात एका मांत्रिकाने एकाच कुटुंबातील तीन महिलांना तंत्र-मंत्राद्वारे श्रीमंत बनवण्याचे आमिष दाखवून त्यांच्यावर तब्बल १० दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी मांत्रिक हा महिलांसोबत त्यांच्या घरी राहत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बलवीर बेराणी (वय ३५) असे आरोपीचे नाव असून तो राजधानी दिल्ली येथील रहिवासी आहे. या प्रकरणी याप्रकरणी अलोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मांत्रिकाने पीडित महिलेच्या आईची रेल्वे स्थानकावर भेट घेतली होती. त्यांनी त्यांच्या घरातील समस्या सांगितल्या. यावर मांत्रिकाने पूजा करून सर्व दुःख दूर करून तुमच्या कुटुंबाला श्रीमंत बनवण्याचे आमिष दाखवले. तसेच घरात लपवून ठेवलेले पैसे देखील बाहेर काढून देतो असे देखील मांत्रिक म्हणाला. त्याच्या आमिषाला बळी पडून महिलेने त्याला घरी आणले. आरोपी बलवीर बैरागी याने घरावर जादूटोणा केल्याची भीती दाखवत महिलांच्या घरी थांबला. येथे त्याने सुमारे दहा दिवस घरातील तीन महिलांवर बलात्कार केला. तांत्रिकाने महिलांना त्यांच्या गळ्यात बांधण्यासाठी ताबीजही दिले. मांत्रिकाने घरातील पुरुषांना मेहंदीपूर बालाजी येथे दर्शनासाठी पाठवले.
आरोपीने पाण्यात काहीतरी मिसळून ते महिलांना प्यायला महिलांनी तक्रारीत म्हटले आहे. यानंतर त्यांना काहीच कळले नाही. महिलांना चाकूचा धाक दाखवून तो वारंवार बलात्कार करत होता. दहा दिवसांनी महिलांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
अलोट तहसीलच्या एसडीओपी साबेरा अन्सारी यांनी सांगितले की, स्वत:ला तांत्रिक म्हणवून घेणारा ३५ वर्षीय व्यक्ती अलोट येथील एका कुटुंबातील तीन महिलांना तंत्राच्या माध्यमातून त्यांच्या समस्या, दु:ख, त्रास दूर करून श्रीमंत बनवण्याचे खोटे आमिष देत होता. पीडित महिलांची तक्रार अलोट पोलीस ठाण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
संबंधित बातम्या