नात्याला काळिमा..! पॉर्न व्हिडिओ पाहून सख्ख्या भावाने बहिणीसोबत केले गैरकृत्य, नंतर आईसमोरच केली हत्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नात्याला काळिमा..! पॉर्न व्हिडिओ पाहून सख्ख्या भावाने बहिणीसोबत केले गैरकृत्य, नंतर आईसमोरच केली हत्या

नात्याला काळिमा..! पॉर्न व्हिडिओ पाहून सख्ख्या भावाने बहिणीसोबत केले गैरकृत्य, नंतर आईसमोरच केली हत्या

Updated Jul 28, 2024 04:49 PM IST

Madhya Pradesh Crime : भावाने मोबाइलवर अश्लील व्हिडिओ पाहून त्याच्या लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार केला व त्यानंतर तिची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, मृत मुलीची आई व दोन मोठ्या बहिणींनी हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला.

पॉर्न व्हिडिओ पाहून सख्ख्या भावाने बहिणीसोबत केले गैरकृत्य
पॉर्न व्हिडिओ पाहून सख्ख्या भावाने बहिणीसोबत केले गैरकृत्य

मध्य प्रदेश मधील रीवा शहरात ९ वर्षीय चिमुकलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक तथ्य समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, चिमुकलीच्या भावाने मोबाइलवर अश्लील व्हिडिओ पाहून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व त्यानंतर तिची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, मृत मुलीची आई व दोन मोठ्या बहिणींनी हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला. ५० लोकांकडे चौकशी व आरोपीची चौकशी तसेच परिस्थितीजन्य पुरावे गोळा केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. याप्रकरणी मृत मुलीचा १३ वर्षीय भाऊ, तिची आई व १७ व १८ वर्षांच्या दोन बहिणींना ताब्यात घेण्यात आले आहे. 

पोलीस अधीक्षक विवेक सिंह यांनी सांगितले की, यावर्षी एप्रिल महिन्यात जवा पोलीस ठाणे क्षेत्रात एका ९ वर्षीय मुलीवर बलात्कार करून गळा दाबून तिची हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. पीडितेचा मृतदेह घराच्या अंगणातून ताब्यात घेण्यात आला. तेथे ती घटनेवेळी झोपली होती. नातेवाईकांच्या चौकशीतून समजले की, पीडितेचा १३ वर्षीय भाऊ रात्री तिच्याजवळ झोपला होता. त्यांनी सांगितले की, मुलाने मोबाइल फोनवर अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बहिणीवर अत्याचार केला होता.

आईने पाहिले की, मुलगी जिवंत आहे, त्यानंतर भावाने पुन्हा तिचा गळा दाबला –

पोलिसांनी सांगितले की, पीडितेने ही गोष्ट वडिलांना सांगण्याची धमकी दिल्यानंतर मुलाने तिचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आईला उठवून त्याने संपूर्ण घटना सांगितली. आईने पाहिल्यानंतर पीडिता जिवंत होती, हे पाहून त्याने पुन्हा आईसमोरच मुलीचा गळा दाबून तिला संपवले. त्यानंतर मुलाच्या दोन मोठ्या बहिणी जाग्या झाल्या त्यांनी पोलिसांना याची माहिती देण्यापूर्वी आपले अंथरुण बदलले. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.

आरोपी मुलगा, दोन बहिणी व आईला अटक –

पोलिसांनी सांगितले की, आरोपी, त्याच्या दोन बहिणी व त्याच्या आईला ताब्यात घेतल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. पोलिसांना २४ एप्रिल रोजी सकाळी माहिती मिळाली होती की, मुलीचा मृतदेह घराच्या अंगणात पडला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये बलात्कार आणि हत्या संबंधित पुरावे मिळाले. त्यानंतर याच्या तपासासाठी एसआयटी पथक स्थापन करण्यात आले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कुटूंबातील सदस्यांनी सांगितले की, विषारी किटकाने चावा घेतल्याने मुलीचा मृत्यू झाला आहे. 

पोलिसांनी सांगितले की, तपासात समजले की, घरात कोणी घुसल्याचे पुरावे मिळाले नाहीत. कुटूंबातील व्यक्तीने कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकला नसल्याचे सांगितले. पोलिस अधीक्षकांनी  सांगितले की, घटनास्थळावरील पुरावे व जवळपास ५० लोकांची साक्ष्य घेतल्यानंतर कुटूंबातील सदस्यांच्या जबाबात बदल झाल्याचे दिसून आले. संशयाच्या आधारावर त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर