Murder and Suicide: कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या, नंतर पतीचीही गळफास लावून आत्महत्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Murder and Suicide: कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या, नंतर पतीचीही गळफास लावून आत्महत्या

Murder and Suicide: कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या, नंतर पतीचीही गळफास लावून आत्महत्या

Dec 31, 2023 05:35 PM IST

Madhya Pradesh Murder And Suicide: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने पत्नीची हत्या करून स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली.

Crime
Crime

Madhya Pradesh Indore Murder: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वत: ही गळफास लावून आत्महत्या केली. घटनेच्या दिवशी मृत दाम्पत्याची मुले घराबाहेर खेळायला गेली होती. मात्र, ते घरी परतल्यानंतर त्यांची आई बेशुद्ध अवस्थेत जमीनीवर पडली होती. तर,वडील घराच्या छताला लटकल्याचे दिसून आले.

या प्रकरणाची माहिती देताना बाणगंगा पोलिस स्टेशनचे प्रभारी नीरज बिरथरे यांनी सांगितले की, शनिवारी आरोपी राम निवरेचे वडील नसरुलाल रहिवासी नरवाल कंकर यांचा त्यांची पत्नी रुक्मिणीबाईसोबत ए सेक्टर बाबू सुपारी कारखान्याजवळ काही कारणावरून वाद झाला. याप्रकरणी आरोपीने घरातील बेडरूममध्ये स्वतःची पत्नी रुक्मिणीबाईची हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्यामध्ये शनिवारी ए सेक्टर बाबू सुपारी कारखान्याजवळ काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर पतीने घरी गेल्यानंतर पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली. हत्येचे खरे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी एमवाय हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मयत दाम्पत्य गेल्या पाच वर्षांपासून ए सेक्टर बाबू सुपारी कारखान्याजवळ झोपडी बांधून राहत होते. आसपासच्या लोकांनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, आजपर्यंत या कुटुंबाला कोणीही भेटायला आले नाही. ते नेमके कोणत्या गावातील रहिवाशी आहेत, याचा खुलासा अद्याप झाला नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर