मराठी बातम्या  /  देश-विदेश  /   रोगापेक्षा इलाज भयंकर! एकाच सीरिंजद्वारे ३० विद्यार्थ्यांचं लसीकरण

रोगापेक्षा इलाज भयंकर! एकाच सीरिंजद्वारे ३० विद्यार्थ्यांचं लसीकरण

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jul 28, 2022 04:59 PM IST

One Syringe for 30 students: मध्य प्रदेशातील एका शाळेत तब्बल ३० विद्यार्थ्यांना एकाच सीरिंजद्वारे कोविड प्रतिबंधक लस दिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं खळबळ उडाली आहे.

Covid Vaccination
Covid Vaccination

One Syringe for 30 students: कोविड लसीकरणातील निष्काळजीपणावरून मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात मोठा गदारोळ झाला आहे. सागर शहरातील एका प्रतिष्ठित शाळेतील तब्बल ३० विद्यार्थ्यांना एकाच सीरिंजद्वारे लस दिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं राज्यात खळबळ उडाली असून या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

जैन पब्लिक उच्च माध्यमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. जितेंद्र राय या कर्मचाऱ्याकडून ही चूक झाली आहे. मुलांसोबत असलेल्या एका पालकाच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यानं तात्काळ आक्षेप घेतला. आतापर्यंत किती सीरिंज संपल्या अशी विचारणा त्यानं लस देणाऱ्या व्यक्तीला केली. त्यावर मी आतापर्यंत ४० जणांना एकाच सीरिंजद्वारे लस दिल्याचं त्यानं सांगितलं. हे ऐकून संबंधित पालकाला धक्काच बसला. त्यानं लगचेच शाळा व्यवस्थापनाकडं याविषयी तक्रार केली.

आमच्या मुलांच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास कोण जबाबदार? काही अनुचित प्रकार घडल्यास शाळा व्यवस्थापन जबाबदारी घेणार की आरोग्य विभाग असा प्रश्न त्यांनी केला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना संबंधित शाळेत जाण्याचे निर्देश दिले. तोपर्यंत पत्रकारांनी लस देणाऱ्या कर्चमाच्यांवर प्रश्नांचा मारा केला. घाबरलेल्या कर्मचाऱ्यानं सगळं काही सांगून टाकलं. लसीकरणासाठी एकच सीरिंज वापरणं चुकीचं आहे हे मला माहीत आहे. मात्र, मला तशा सूचना दिल्या गेल्यामुळं मी एकच सीरिज जास्तीत जास्त मुलांसाठी वापरल्या, असं तो म्हणाला.

केंद्र सरकार, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी वेळोवेळी या संदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. लसीकरण करताना एका व्यक्तीसाठी एक सीरिंज वापरणं गरजेचं आहे. शाळा व्यवस्थापनानं या मार्गदर्शक तत्वांचं सर्रास उल्लंघन केलं आहे. जिल्हा प्रशासनानं याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग