मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: पतीचे गाल आत गेले म्हणून पत्नीचा सासरी येण्यास नकार, लग्नाच्या ९ वर्षानंतर म्हणतेय...

Viral News: पतीचे गाल आत गेले म्हणून पत्नीचा सासरी येण्यास नकार, लग्नाच्या ९ वर्षानंतर म्हणतेय...

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 20, 2024 07:59 PM IST

Madhya Pradesh Viral News: मध्य प्रदेशच्या छतरपूर येथील एक महिला लग्नाच्या ९ वर्षानंतर पती आवडत नसल्याचे कारण देत माहेरी निघून गेली.

मध्य प्रदेशच्या छतरपूर येथे पतीचे गाल आत गेले म्हणून माहेरी गेलेल्या महिलेने सासरी येण्यास नकार दिला.
मध्य प्रदेशच्या छतरपूर येथे पतीचे गाल आत गेले म्हणून माहेरी गेलेल्या महिलेने सासरी येण्यास नकार दिला.

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशच्या छतरपूर येथून सगळ्यांना आश्चर्यचकीत करणारी माहिती समोर आली. माहेरी गेलेल्या पत्नीने सासरी परतण्यास नकार दिल्याने पतीने पोलीस ठाणे गाठले आहे. पतीचे गाल आत गेल्यामुळे तो मला आवडत नाही, असे तक्रारदाराच्या पत्नीने सांगितले आहे. यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमन अहिरवार असे तक्रारदार व्यक्तीचे नाव असून तो छतरपूर जिल्ह्यातील बमनौरा येथील रहिवाशी आहे. दरम्यान, त्याचे ९ वर्षांपूर्वी सागर जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणारी रानू अहिरवार हिच्याशी लग्न झाले. त्यांना दोन मुले देखील आहेत. अमनने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, दोन महिन्यापूर्वी त्याची पत्नी त्याला काही न सांगता माहेरी निघून गेली. त्यानंतर रानूला परत घरी आणण्यासाठी त्याच्या सासरी गेली. मात्र, सासरच्या लोकांनी त्याला मारहाण केली आणि तिथून त्याला हकलून दिले. एवढेच नव्हेतर, त्याच्याविरोधात सागर पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दिली.

अमन पुढे म्हणाला की, "मी माझी पत्नी रानूला घर परतण्याची विनंती केली. त्यावेळी रानूने नकार दिला आणि तिला माझ्यासोबत राहण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. ती म्हणाली की, मला आता तू आवडत नाही. तुझे गाल आत गेले आहेत. यामुळे मला सासरी यायचे नाही." गेल्या दोन महिन्यापासून अमन रानूला आपल्या घरी नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

रानू अमनपेक्षा दिसायला सुंदर आहे. यामुळे तिला त्याच्यासोबत राहायचे नाही. रानू तिच्या बहिणीच्या नवऱ्याचे ऐकून सासरी परतण्यास नकार देत असल्याचे अमनने आरोप करत आहे. अमन आणि रानू दोघेही इयत्ता आठवीपर्यंत शिकले आहेत. रानू त्यांच्या मोठ्या मुलाला माहेरी घेऊन गेली आहे. तर, धाकटा मुलगा अमन याच्याकडे आहे.

IPL_Entry_Point

विभाग