अजान सुरू होताच भाजप सरकारमधील मंत्र्यानं थांबवलं भाषण, व्यासपीठावरूनच पठण केलं ‘ला इलाहा इल्लल्लाह…’
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अजान सुरू होताच भाजप सरकारमधील मंत्र्यानं थांबवलं भाषण, व्यासपीठावरूनच पठण केलं ‘ला इलाहा इल्लल्लाह…’

अजान सुरू होताच भाजप सरकारमधील मंत्र्यानं थांबवलं भाषण, व्यासपीठावरूनच पठण केलं ‘ला इलाहा इल्लल्लाह…’

Nov 27, 2024 05:35 PM IST

Gautam Tetwal Azaan : मध्य प्रदेशमधील मोहन यादव सरकारमधील मंत्री गौतम टेटवाल एका कार्यक्रमात लोकांना संबोधित करत होते. तेव्हा अजानची आवाज ऐकू आला त्य़ानंतर त्यांनी आपले भाषण मध्येच थांबवले.

गौतम टेटवाल
गौतम टेटवाल

Gautam Tetwal Azaan Video : मध्य प्रदेश राज्यातील राजगड जिल्ह्यातील सारंगपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार व राज्यमंत्री गौतम टेटवाल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ महू येथील असून २४ नोव्हेंबर रोजी व्हायरल झाला आहे.सायंकाळच्या सुमारास ते एका भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी जवळच असलेल्या मशिदीतून अजानची आवाज आल्यावर आपले भाषण थांबवले व अजान संपल्यानंतर पुन्हा भाषण सुरू केले. ही घटना अशावेळी घडली आहे, जेव्हा देशभरातपंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘एक हैं तो सेफ हैं’ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ चा नारा चर्चेत आला आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश राज्यातील संभल मध्य़े झालेल्या हिंसाचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मध्य प्रदेशमधील मोहन यादव सरकारमधील मंत्री गौतम टेटवाल एका कार्यक्रमात लोकांना संबोधित करत होते. हा कार्यक्रम राजगडमधील मऊ गावात होत होता. जेव्हा टेटवाल भाषण करत होते, तेव्हा अजानची आवाज ऐकू आला त्य़ानंतर त्यांनी आपले भाषण मध्येच थांबवले.

हा कार्यक्रम सायंकाळी सव्वा सात वाजता होत होता व मशिदीमध्ये नमाज पठण केले जात होते. अजान संपल्यानंतर टेटवाल यांनी भाषण सुरू केल्यानंतर म्हणाले की,‘ईश्वर एक आहे. त्याला शरण जा. नेक काम करा.’ यावेळी त्यांनी एक श्लोकही सांगितला, ‘सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.’ या श्लोकाचा अर्थ सांगताना त्य़ांनी म्हटले की, जगात सर्वांचा सन्मान करा, सर्व सुखी राहो, सर्व निरोगी राहो, सर्वांचे सबका व्हावे. यावेळी त्यांनी मंचावरून ‘ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल अल्लाह… पठण केले.गौतम टेटवाल यांचा यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल सध्या होत आहे. यावरून काहींनी त्यांच्यावर निशाणा साधला असून हिंदू समाजाची माफी मागावी, असे म्हटले आहे.

कोण आहेत गौतम टेटवाल?

याआधीही मंत्री टेटवाल आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. सारंगपूर राखीव जागेवरून गौतम टेटवाल दुसऱ्य़ांदा आमदार बनले आहेत. त्यांना मोहन यादव य़ांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. अनूसचित जाती प्रवर्गातून आलेले गौतम टेटवाल जिल्ह्यातील पहिले नेते आहेत, ज्यांना मंत्री बनवले आहे. याआधी कधीही एससी प्रवर्गातील नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते.
सारंगपूरमधून गौतम टेटवाल २००८ मध्य़े पहिल्य़ांदा आमदार बनले होते. त्यानंतर २०१३ व २०१८ मध्ये त्यांना तिकीट मिळाले नव्हते. या काळात भाजपचे कुंवर कोठार आमदार बनले होते. मात्र य़ावेळी पक्षाने कोठार यांचे तिकीट कापून गौतम टेटवाल यांना पुन्हा मैदानात उतरवले होते.

कलमा पठण केल्यामुळे टीका -
भाजपच्याच मंत्र्याने मंचावरून कलमा पठण केल्यामुळे संस्कृती बचाव मंचानेयाचा तीव्र विरोध केला आहे. मंचाचे अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी म्हणाले की, मंत्री सर्व धर्माचा आदर करतात यात दुमत नाही. मात्र, आम्ही हिंदुत्ववादी लोक त्यांच्यासाठी लढाई लढतोय. मंदिरात आरती सुरू असल्यावर कोणताच मंत्री आपले भाषण थांबवत नाही किंवा त्यात सहभागी होत नाही. पण अजान सुरू झाली की भाषण थांबवतात आणि आता तर स्वत: कलमा पठण करत आहेत. उद्या नमाजही पढतील, असा संताप चंद्रशेखर तिवारी यांनी व्यक्त केला.त्यांनी हिंदू समाजाची माफी मागावी, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर