MP Accident: डंपरला धडकल्यानंतर बसला भीषण आग, ११ जणांचा होरपळून मृत्यू, मध्य प्रदेशातील घटना!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  MP Accident: डंपरला धडकल्यानंतर बसला भीषण आग, ११ जणांचा होरपळून मृत्यू, मध्य प्रदेशातील घटना!

MP Accident: डंपरला धडकल्यानंतर बसला भीषण आग, ११ जणांचा होरपळून मृत्यू, मध्य प्रदेशातील घटना!

Dec 28, 2023 06:33 AM IST

Madhya Pradesh Bus And Dumper Truck Accident: मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात प्रवासी बस आणि डंबरमध्ये भीषण अपघात झाला.

Madhya Pradesh Accident
Madhya Pradesh Accident

Madhya Pradesh Guna Accident: मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात बुधवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. डंपरला धडकल्यानंतर बसला लागलेल्या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या गुना-आरोन रोडवर बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका डंपरने एका प्रवासी बसला धडक दिली. यानंतर बस पलटी होऊन त्यात आग लागली. या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, अनेक जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे, या अपघातानंतर रुग्णवाहिका वेळ न पोहोचल्याचा आरोप केला जात आहे.

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सोशल मीडियाद्वारे या अपघातावर शोक व्यक्त केला."गुना ते आरोनला जाणाऱ्या बसला भीषण आग लागल्याने प्रवाशांचे नुकसान झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. या हृदयद्रावक अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. या दु:खाच्या परिस्थितीत राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे. भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मी प्रशासनाला जखमी प्रवाशांवर योग्य उपचार करण्याची तसेच अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत", असे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याच्या सूचना मुख्यमंत्री डॉ.यादव यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विट करून लिहिले की, "गुना आरोन रोडवरील प्रवासी बसला आग लागल्याची बातमी दुःखद आहे. घटनेची माहिती मिळताच गुना जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो. अपघातात जखमी झालेले नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो."

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर