मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Madhavi Raje Scandia : राजमाता माधवी राजे सिंधिया यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, अनेक नेते उपस्थित

Madhavi Raje Scandia : राजमाता माधवी राजे सिंधिया यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, अनेक नेते उपस्थित

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 16, 2024 06:22 PM IST

Madhavi Raje scandia Cremation : माधवी राजे सिंधिया यांच्यावर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास'अम्मा महाराज की छतरी'येथे अंत्यसंस्कार केले जातील. हा स्थान ग्वाल्हेरच्या शाही कुटूंबातील सदस्यांच्या अंतिम संस्कारासाठी राखीव आहे.

राजमाता माधवी राजे सिंधिया यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
राजमाता माधवी राजे सिंधिया यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आई माधवी राजे सिंधिया (Madhavi raje scandia ) यांचे अंतिम संस्कार गुरुवारी सांयकाळी केले जाणार आहेत. त्यांचे पार्थिव शरीर गुरुवारी विशेष विमानाने दिल्लीतून ग्वाल्हेरला आणले गेले. त्यानंतर त्यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या रुग्णवाहिकेतून ग्वाल्हेर विमानतळावरून जयविलास परिसरात असणाऱ्या राणी महालात आणले गेले. यावेळी पार्थिवासोबत रुग्णवाहिकेच केंद्रीय मंत्री सिंधिया तसेच कुटूंबातील अन्य सदस्य उपस्थित होते.

ट्रेंडिंग न्यूज

अंतिम दर्शनासाठी हजारो लोकांची गर्दी -

माधवी राजे सिंधिया यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी विमानतळावर मोठ्या संख्येने लोक जमले होते. लोकांना पार्थिवाचे दर्शन करण्यासाठी काही वेळासाठी रुग्णवाहिकेचा दरवाजाही उघडण्यात आला. त्यानंतर त्यांचे पार्थिक राणी महालात ठेवले गेले.

माधवी राजे सिंधिया यांच्यावर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास 'अम्मा महाराज की छतरी'  येथे अंत्यसंस्कार (Madhavi Raje scandia Cremation) केले जातील. हा स्थान ग्वाल्हेरच्या शाही कुटूंबातील सदस्यांच्या अंतिम संस्कारासाठी राखीव आहे. 

अंतिम संस्कारावेळी अनिक VIP असणार उपस्थित -

माधवी राजेंच्या अंतिम संस्कारावेळी नेपाळचा शाही परिवार तसेच देशातील अनेक राजघराण्यातील सदस्य सामील होणार आहे. त्याचबरोच भाजप आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

माधवी राजे शिंदे यांच्याविषयी -

ग्वाल्हेरच्या राजमाता माधवी राजे यांचे बुधवारी सकाळी दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले. गेल्या तीन महिन्यांपासून त्या दिल्ली एम्समध्ये दाखल होत्या. त्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या. सेप्सिससह न्यूमोनिया झाल्यानंतर त्यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू होतते. माधवी राजे या नेपाळच्या राजघराण्यातील होत्या तसेच त्या धर्मादाय कार्यात खूप सक्रिय होत्या. माधवी राजे २४ चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा होत्या जे शिक्षण आणि वैद्यकीय सेवा यासारख्या क्षेत्रात मदत करतात. 

माधवी राजा यांचे ८ मे १९६६ रोजी ग्वाल्हेरचे तत्कालीन महाराज माधवराव शिंदे यांच्याशी विवाह झाला होता. माधवराव शिंदे यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. माधवी शिंदे यांचे आजोबा समशेर जंग बहादूर नेपाळचे पंतप्रधान होते. माधवी राजे यांना राजकुमारी किरण राज्य लक्ष्मी देवी या नावानेही ओळखले जात होते.

IPL_Entry_Point

विभाग