Viral news : निकाहमध्ये पैशांचा पाऊस! नवरदेवाला हुंड्यात मिळाले २.५ कोटी तर बूट चोरणाऱ्यांना मिळाले ११ लाख अन् बरंच काही
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral news : निकाहमध्ये पैशांचा पाऊस! नवरदेवाला हुंड्यात मिळाले २.५ कोटी तर बूट चोरणाऱ्यांना मिळाले ११ लाख अन् बरंच काही

Viral news : निकाहमध्ये पैशांचा पाऊस! नवरदेवाला हुंड्यात मिळाले २.५ कोटी तर बूट चोरणाऱ्यांना मिळाले ११ लाख अन् बरंच काही

Dec 02, 2024 01:28 PM IST

Viral News : दिल्ली-डेहराडून महामार्गावरील एका आलिशान रिसॉर्टमध्ये एका भव्य लग्नसमारंभात सूटकेसमध्ये २ कोटी ५६ लाख रुपयांची रोकड हुंडा म्हणून देण्यात आली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

निकाहमध्ये पैशांचा पाऊस! नवरदेवाला हुंड्यात मिळाले २.५ कोटी तर बूट चोरणाऱ्यांना मिळाले ११ लाख
निकाहमध्ये पैशांचा पाऊस! नवरदेवाला हुंड्यात मिळाले २.५ कोटी तर बूट चोरणाऱ्यांना मिळाले ११ लाख

Viral News : मेरठमधील दिल्ली-डेहराडून महामार्गावरील एका मोठ्या रिसॉर्टमध्ये एक शाही  विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात सूटकेसमध्ये भरून तब्बल २ कोटी ५६ लाख रुपये रोख हुंड्यापोटी नवर देवाला देण्यात आले.  हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्न समारंभात बूट चोरणाऱ्यांना ११ लाख रुपये तर  आणखी  ८ लाख रुपये दुसऱ्या एका विधीसाठी देण्यात आले आहेत.  हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आयकर आणि ईडीचे पथक अशा लोकांवर छापे टाकत नाही का असा सवळ त्यांनी विचारलं आहे. तर  एवढी रोकड कुठून आली आणि त्याचा हिशेब कोण घेणार, असा सवाल देखील काहींनी विचारला आहे.  

मेरठमधील एनएच-५८ वरील एका मोठ्या  रिसॉर्टमध्ये चार दिवसांपूर्वी हा भव्य विवाह सोहळा पार पडला.  नवरदेवाची वरात ही गाझियाबादहून मेरठला आली होती. लग्नादरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनी हुंड्यापोटी २ कोटी ५६ लाख रुपयांची रोख रक्कम नवरदेवाला हुंदयपोटी दिली.   हे पैसे एका मोठ्या सूटकेसमध्ये भरून नवरदेवाच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी काही लोक व्हिडिओ बनवत होते. व्हिडिओतील रक्कम २.५६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. तर बूट चोरीच्या विधीसाठी  ११ लाख रुपये आणि पूजेच्या  नावाखाली ८ लाख रुपये दिल्याचे या व्हिडिओत ऐकायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया कारवाई कधी होणार ? 

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.  पैसे देणाऱ्यांवर कारवाई काय करणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.  व्हायरल व्हिडिओवर   कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अशा लोकांवर आयकर आणि ईडीकडून छापे टाकले जात नाही का ? असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.   ज्यांनी एवढी रोकड दिली त्यांनी हे पैसे कुठून आणले, असा प्रश्न व्हायरल व्हिडिओबाबत उपस्थित केला जात आहे. हा व्हिडिओ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, लग्न ही कुटुंबाची वैयक्तिक आणि कौटुंबिक बाब आहे. कोणत्याही बाजूने तक्रार आल्यास त्याची चौकशी केली जाऊ शकते. तक्रारीच्या आधारेच कारवाई शक्य आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर