लुधियानामधील साहनेवाल येथे घरमालकाच्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका मजुरावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी साहनेवाल पोलिसांनी गुरुवारी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीडित मुलीच्या आईच्या जबाबावरून एफआयआर दाखल करण्यात आला आला. आरोपी गेल्या दोन वर्षांपासून पीडिताच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता.
२९ जानेवारी रोजी मुलगी घरी एकटी असताना आरोपीने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने तिला गप्प बसण्याची धमकी दिली आणि पळून गेला. याप्रकरणी पीडिताच्या आईने स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने सांगितले की, जेव्हा ती आणि तिचा पती घरी परतले तेव्हा त्यांना आपली मुलगी रडताना दिसली. याबाबत महिलेने तिच्या मुलीकडे विचारणा केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
या प्रकरणाचा तपास करणारे एएसआय राम मूर्ती यांनी सांगितले की, कुटुंबीयांनी गुरुवारी पोलिसात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३७६ (बलात्कार), बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या कलम ४ आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी विवाहित आहे, पण तो एकटाच शहरात राहत होता. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.