लखनौ विमानतळावर किरणोत्सर्गी पदार्थाच्या गळतीमुळे खळबळ; तब्बल १.५ किमी परिसर केला रिकामा; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर-lucknow airport radioactive material leak creates panic 2 employees faint uttar pradesh news ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  लखनौ विमानतळावर किरणोत्सर्गी पदार्थाच्या गळतीमुळे खळबळ; तब्बल १.५ किमी परिसर केला रिकामा; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

लखनौ विमानतळावर किरणोत्सर्गी पदार्थाच्या गळतीमुळे खळबळ; तब्बल १.५ किमी परिसर केला रिकामा; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

Aug 17, 2024 02:06 PM IST

lucknow airport : लखनौ विमानतळावर किरणोत्सर्गी पदार्थाच्या (radioactive material) गळतीमुळे खळबळ उडाली आहे. यामुळे विमानतळावरील दोन कर्मचारी बेशुद्ध पडले आहे. या घटनेची माहिती समजताच १.५ किलोमीटरचा परिसर रिकामा करण्यात आला आहे.

लखनौ विमानतळावर किरणोत्सर्गी पदार्थाच्या गळतीमुळे खळबळ; तब्बल १.५ किमी परिसर केला रिकामा; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
लखनौ विमानतळावर किरणोत्सर्गी पदार्थाच्या गळतीमुळे खळबळ; तब्बल १.५ किमी परिसर केला रिकामा; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

Lucknow airport radioactive material leak : लखनौ विमानतळावर आज एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील कार्गो टर्मिनलवर कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारा एक किरणोत्सर्गी पदार्थ सापडला असून त्यातून किरणोत्सर्ग झाल्याने विमानतळावरील दोन कर्मचारी बेशुद्ध झाले. किरणोत्सर्ग होताच सुरक्षा उपकरणांचा अलार्म वाजला. यामुळे घबराट उडाली. या घटनेची माहिती तातडीने एनडीआरएफ, एसडीआरएफ व इतर सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली. त्यानंतर तब्बल १.५ किमी परिसर हा रिकामा करण्यात आला आहे. बेशुद्ध झालेल्या कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत. ज्यांना ज्यांना किरणोत्सर्ग झालं आहे त्यांना थांबून घेण्यात आले असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी एक विमान लखनौहून गुवाहाटीला जात होते. लखनौ विमानतळाच्या टर्मिनल ३ वर स्कॅनिंग दरम्यान मशीनचा बीप वाजला. कर्करोगविरोधी औषधे लाकडी पेट्यांमध्ये पॅक करण्यात आले होते. ज्यामध्ये किरणोत्सर्गी घटक वापरले जातात. ही किरणोत्सर्गी सामग्री लीक झाली. यामुळे अलार्म वाजताच सुरक्षा यंत्रणांना याची माहिती देण्यात आली. यासोबतच एनडीआरएफ आणि एसडीआरएफलाही पाचारण करण्यात आले होते. यादरम्यान एकच गोंधळ उडाला. हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. प्रवाशांना हटवून जागा मोकळी करण्यात आली आहे.

गळती झालेला पदार्थ फ्लोरीन ?

दरम्यान, गळती झालेला पदार्थ हा फ्लोरीन असल्याची माहिती आहे. हा पदार्थ मानवी शरीरावर नकारात्मक परिणाम टाकत असतो. फ्लोरीनमुळे आग लागू शकते किंवा ती भडकू शकते. फ्लोरीन ऑक्सिडायझर म्हणून कार्य करते. फ्लोरीन गॅस असून तो गरम झाल्यास मोठा स्फोट होऊ शकतो. तसेच हा गॅस श्वासामार्फत पोटात गेल्यास मृत्यू देखील ओढवू शकतो. फ्लोरीनमुळे जळजळ आणि डोळ्यांना मोठा त्रास होऊ शकतो.

 

फ्लोरीनची इजा टाळण्यासाठी संरक्षणात्मक हातमोजे चेहऱ्याचे संरक्षण करणारे हेल्मेट व्यापले जाते. तसेच श्वासनाद्वारे ते पोटात जाऊ नये या साठी काळजी घेणे गरजेचे असते. कपडे, विसंगत पदार्थ आणि ज्वलनशील पदार्थांपासून फ्लोरीन दूर ठेवले जाते. गॅस गळती रोखण्यासाठी फ्लोरीनचा वापर घराबाहेर किंवा हवेशीर भागातच करणे गरजेचे असते. फ्लोरीन गॅसमध्ये श्वासाद्वारे पोटात घेऊ नका. फ्लोरीन हाताळल्यानंतर हात स्वच्छ धुवून हवेशीर ठिकाणीच साठवून ठेवणे गरजेचे असते.

विभाग