Mamata Banerjee : इंडियाच्या दोन बैठकांमुळंच गॅस सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त; ममतांचा मोदींना टोला
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mamata Banerjee : इंडियाच्या दोन बैठकांमुळंच गॅस सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त; ममतांचा मोदींना टोला

Mamata Banerjee : इंडियाच्या दोन बैठकांमुळंच गॅस सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त; ममतांचा मोदींना टोला

Aug 30, 2023 12:29 PM IST

Mamata Banerjee on Gas Cylinder Price cut : केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत घट केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

Mamata Banerjee
Mamata Banerjee

INDIA Alliance : केंद्र सरकारने १४ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमतींमध्ये घट केल्याची घोषणा केली. उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजीवर २०० रुपये प्रति सिलिंडरची कपात करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. केंद्र सरकारच्या या निर्णायवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी टीकास्त्र सोडले आहे. इंडिया आघाडीच्या दोन बैठकांमुळेच मोदी सरकारने घरगुती सिलिंडरच्या किंमतीत घट केली आहे, अशा आशयाचे ममता बॅनर्जी यांनी ट्वीट केले .

ममता बॅनर्जीने नुकतेच ट्विट केले. या ट्विटमध्ये ममता बॅनर्जींनी म्हटले की, गेल्या दोन महिन्यात इंडिया आघाडीच्या दोन बैठका पार पडल्या. आज आपण पाहतोय की, एलपीजी सिलिंडरचे दर २०० रुपयांनी कमी झाले. ही इंडिया आघाडीची ताकद आहे.”

इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत विरोधीपक्षातील अनेक दिग्गज नेते उपस्थिती दर्शवणार आहेत. इंडिया आघाडीची पहिल्या दोन बैठक पटना आणि बंगळुरू येथे झाल्या. मुंबईत होणाऱ्या या बैठकीपूर्वी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनीही नरेंद्र मोदीवर टीका केली आहे.

केंद्र सरकारवर निशाणा साधत लालू म्हणाले की, 'इंडिया' हे नाव ठेवल्यानंतर भाजप पक्षाचे जगणे कठीण झाले आहे. आम्ही संपूर्ण देशात भाजपविरोधात जोरदार लढा देऊ. आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जागेवर थेट लढत होणार आहे. एका बाजुला इंडिया आघाडीचे उमेदवार असतील. तर, दुसऱ्या बाजूला भाजपचे उमेदवार असतील. इंडिया आघाडी नावाचे देशभरातून कौतूक होत आहे. २०२४ निवडणुकीत नरेंद्र मोदींना पराभवाला सामोरे जावा लागणार आहे, असेही लालू प्रसाद यादव यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

इंडिया आघाडीच्या दोन बैठक पार पडल्या आहेत. तर, 'इंडिया' आघाडीची तिसरी बैठक ३१ ऑगस्टपासून दोन दिवस होणार आहे. १ सप्टेंबरपर्यंत चालणारी ही बैठक मुंबईत होणार आहे. बैठकीचा अजेंडा जवळपास निश्चित झाला आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर