मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  New year 2024: नव्या वर्षात बदलणार अनेक आर्थिक नियम, तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? वाचा!

New year 2024: नव्या वर्षात बदलणार अनेक आर्थिक नियम, तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? वाचा!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 31, 2023 12:46 PM IST

New year 2024 economic changes : १ जानेवारी २०२४ पासून अनेक आर्थिक घडामोडीत बदल होणार आहेत. अर्थविषयक अनेक नियमांमध्ये मोठे बदल होणार असून काही गोष्टी महाग तर काही गोष्टी स्वत: होणार आहेत.

commercial lpg gas cylinder price hike
commercial lpg gas cylinder price hike (PTI)

Happy News Year 2024 : नवीन वर्ष २०२४ सुरू होण्यास अवघे काही तास उरले आहेत. या नव्या वर्षात अर्थ विषयक अनेक नियमांत बदल होणार आहेत. काही नियम बदलल्याने सामान्य नागरिकांच्या अडचणी वाढू शकतात, तर आर्थिक बाबतीत अनेक सूट देखील नव्या वर्षात सामान्य नागरिकांना सरकार देणार आहेत. जाणून घेऊयात १ जानेवारीपासून होणाऱ्या आर्थिक बदलांविषयी.

ट्रेंडिंग न्यूज

एलपीजी सिलेंडर होणार स्वस्त

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १ जानेवारीपासून राजस्थानमध्ये एलपीजी सिलिंडर ४५० रुपयांना मिळणार आहे. मात्र, त्याचा लाभ केवळ उज्ज्वला लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. भाजपने निवडणूक आश्वासनात या बाबत घोषणा केली होती, जी आता सरकार पूर्ण करणार आहे. सरकारी तेल कंपन्यांनीही नवीन वर्षात घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

Thane rave party : ठाण्यात पोलिसांनी उधळली रेव्ह पार्टी! अमली पदार्थही जप्त; १०० जणांना घेतले ताब्यात

सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात वाढ

सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरात ०.२० टक्के आणि तीन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवरील व्याजदरात ०.१० टक्के वाढ केली आहे. इतर सर्व छोट्या योजनांचे दर आहे तेच राहणार आहेत. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत ठेवीवरील व्याजदर सध्याच्या ८ टक्क्यांवरून ८.२ टक्के करण्यात आले आहेत. तर तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील दर सध्याच्या सात टक्क्यांवरून ७.१ टक्के करण्यात आला आहे.

महागाई भत्त्याबाबत निर्णय

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. याची अंमलबजावणी १ जानेवारीपासूनच होणार आहे. हा भत्ता ४ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे. भत्ता ४ टक्क्यांनी वाढल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ५० टक्के होईल. केंद्रीय कर्मचार्‍यांचा भत्ता ५० टक्के किंवा त्याहून अधिक होताच, एचआरए सुधारित होणार आहे.

अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्समध्ये भारतीय वंशाच्या कुटुंबाचा संशयास्पद मृत्यू; कर्ज फेडण्यासाठी विकला होता आलीशान बंगला

उशिरा ITR भरल्यास काय होईल?

आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी दंडासह आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे. या मुदतीत चूक केल्यास, आयकर कायद्याच्या कलम २३४ F अंतर्गत करदात्यांच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते. या अंतर्गत एखाद्याला तुरुंगात पाठवण्याचीही तरतूद आहे.

बँक लॉकर करार

सेंट्रल रिझर्व्ह बँकेच्या मते, सुधारित बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ आहे. ही मुदत चुकली तर नवीन वर्षात लॉकर गोठवले जाणार आहेत. ज्या ग्राहकांनी ३१ डिसेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी बँक लॉकर करार केला असेल, त्यांना सुधारित करारावर स्वाक्षरी करावी लागणार आहे. या साठी त्यांना बँकेच्या शाखेत जावे लागणार आहे.

myanmar soldiers : लढण्या एवजी म्यानमारमधून पळून आले १५१ सैनिक; भारतीय सैनिकांनी घेतले ताब्यात

सिम कार्ड खरेदी करण्याचे नियम

नव्या वर्षात नवीन सिम कार्ड खरेदीचे नियम देखील बदलण्यात आले आहेत. नवीन वर्षात कागदावर आधारित नो युवर कस्टमर (केवायसी) ऐवजी आता पेपरलेस केवायसी प्रक्रिया करावी लागणार आहे. या प्रक्रियेसोबत बायोमेट्रिकद्वारेही तपशील देणे बंधनकारक राहणार आहे.

निष्क्रिय UPI आयडी

नवीन वर्षात निष्क्रिय UPI आयडी बंद होतील. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पेमेंट अॅप्स (गुगल पे, पेटीएम फोन पे) यांना असे करण्यास सांगितले आहे. यानुसार, जर यूपीआय आयडी एक वर्षापेक्षा जास्त काळ वापरला नसेल तर तो निष्क्रिय केला जाणार आहे.

वाहने होणार महाग

महागाईचा ताण आणि वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे अनेक बड्या कंपन्यांनी कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये मारुती सुझुकी, ह्युंदाई, मर्सिडीज आणि ऑडी यांचा समावेश आहे.

सेबीने डिमॅट खातेधारकांना दिलासा देत नॉमिनी जोडण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. सेबीने डिमॅट आणि म्युच्युअल फंड खातेधारकांसाठी नॉमिनी जोडण्याची अंतिम मुदत पुढील वर्षी ३० जूनपर्यंत वाढवली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग