सर्वसामान्य नागरिकांना झटका! घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सर्वसामान्य नागरिकांना झटका! घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ

सर्वसामान्य नागरिकांना झटका! घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ

Published Apr 08, 2025 09:14 AM IST

LPG Price 8 April 2025: आजपासून दिल्लीत घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर ८०३ रुपयांना मिळणार आहे. तब्बल ५० रुपयांची वाढ झाली आहे.

सर्वसामान्य नागरिकांना झटका! घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ
सर्वसामान्य नागरिकांना झटका! घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ

LPG Price 8 April 2025 : केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका दिला आहे. आजपासून घरगुती एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) सिलिंडरच्या किमती ५० रूपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. दिल्लीत आजपासून १४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर ८०३ रुपयांऐवजी ८५३ रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत ८०२.५० रुपयांऐवजी ८५२.५० रुपये झाली आहे. चेन्नईत ८१८.५० रुपयांऐवजी ८५८.५० रुपयांना घरगुती सिलेंडर मिळणार आहे.

घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच १४ किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १ ऑगस्ट २०२४ रोजी बदल करण्यात आला होता, त्यानंतर ७ एप्रिल रोजी ही वाढ जाहीर करण्यात आली आणि नवे दर आजपासून लागू झाले आहेत.

इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून लखनौमध्ये एलपीजीसिलिंडरची किंमत ८९०.५० रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. तर पाटण्यात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ९५१ रुपये झाली आहे. जयपूरमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ८५६.५० रुपये झाली आहे. डेहराडूनमध्ये गॅस सिलिंडरची किंमत ८५०.५० रुपये झाली आहे.

हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये सिलिंडरची किंमत ८९७.५० रुपये, भोपाळमध्ये सिलिंडरची किंमत ८५८.५० रुपये झाली आहे. गांधीनगरमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ८७८.५० रुपये, श्रीनगरमध्ये ९६९.०० रुपये, इंदूरमध्ये ८८१ रुपये, दक्षिण अंदमानमध्ये ९२९ रुपयाला घरगुती सिलेंडर मिळणार आहे. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत आजपासून दिब्रुगडमध्ये ८५२ रुपये, कारगिलमध्ये ९८५.५० रुपये आणि विशाखापट्टणममध्ये ८६१ रुपये झाली आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोमवारी सांगितले की, एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ होणार आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ती ५०० रुपयांवरून ५५० रुपये झाली आहे. या निर्णयाचा आम्ही नंतर आढावा घेऊ, असेही पुरी म्हणाले.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, आम्ही दर २-३ आठवड्यांनी याचा आढावा घेतो. त्यामुळे आपण पाहिलेली उत्पादन शुल्कातील वाढ पेट्रोल आणि डिझेलवरील ग्राहकांवर पडणार नाही. तेल विपणन कंपन्यांना त्यांच्या गॅस भागावरील तोटा म्हणून ४३,००० कोटी रुपये भरून काढण्यासाठी ही उत्पादन शुल्क वाढ करण्यात आली आहे. "

Ninad Vijayrao Deshmukh

TwittereMail

निनाद देशमुख हिंदुस्तान टाइम्स-मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून २०२२ पासून कार्यरत आहे. निनादने पुणे विद्यापीठातून एमए (जर्नलिझम) शिक्षण घेतले आहे. पुण्यातील केसरी वृत्तपत्रातून २००७ मध्ये बातमीदार म्हणून करियरची सुरूवात. २००९ ते २०२२ पर्यंत लोकमत, पुणे येथे वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केले. निनादला डिफेन्स, सायन्स, अंतराळ विज्ञान, आंतरराष्ट्रीय राजकारण विषयांची विशेष आवड आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर