Viral News : तुम्ही जुदाई हा चित्रपट पाहिला असेल यात प्रेयसी ही प्रियकराला मीवळण्यासाठी त्याच्या पत्नीला कोट्यवधी रुपये देऊन विकत घेते. या चित्रपटाचे कथानक प्रत्यक्षात घडले आहे. मात्र, पत्नीने पतीच्या प्रेयसीकडून तब्बल दीड कोटी रुपये घेऊन घटस्फोट देण्यास नकार देत महिलेची फसवणूक केली आहे.
चीनमध्ये एका महिलेने आपल्या विवाहित प्रियकराला मिळवण्यासाठी त्याच्या पत्नी सोबत त्याला घटस्फोट देण्यासाठी करार केला. या साठी तिने तब्बल १.२ युआन म्हणजेच दीड कोटी रुपये प्रियकराच्या पत्नीला दिला. मात्र, प्रियकराच्या पत्नीने तिच्याकडून पैसे घेतले मात्र, नवऱ्याला घटस्फोटही दिला नाही. यानंतर तिने पैसे परत करण्यास नकार दिला. हे प्रकरण न्यायालयात गेल्याने न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने ही पत्नीच्या बाजूने निकाल दिला. कोर्टाने सांगितले की, कुलिंग ऑफ कालावधीत महिलेने तरुणाच्या पत्नीला पैसे दिले होते. याशिवाय हा सगळा व्यवहार तोंडी होता. याचे कोणतेही लेखी पुरावे नाहीत.
डिसेंबर २०१३ मध्ये चीनच्या शिशी येथील रहिवासी असलेल्या हान चे फुजियान प्रांतात लग्न झाले होते. त्याच्या पत्नीचे नाव यांग असून त्याला दोन मुली आहेत. त्यानंतर हानचे त्याच्यासोबत काम करणाऱ्या शी नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. दोघांनी पार्टनरशिपमध्ये बिझनेसही केला. या दोघांना एक मुलगा देखील आहे. शी ने हांग ची पत्नी यांग हिच्याशी संपर्क साधत तिला २० लाख युआन देण्याचे आमिष देत हानला घटस्फोट देण्याची मागणी केली. यांगने हा करार स्वीकारला. ठरल्यानुसार शीने यांगला तिचा पती हान याला घटस्फोट देण्यास सांगितले. मात्र, तिने हान याला घटस्फोट देण्यास नकार दिला.
एक वर्ष उलटून गेल्यानंतर शी हीने तिचे पैसे यांग हिला परत मागण्यास सुरुवात केली. मात्र, पैसे परत देण्यास यांगने नकार दिल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. यांग यांच्याशी आपला शाब्दिक करार झाल्याचा दावा शी हीने न्यायालयात केला. पैसे मिळाल्यानंतर यांग ही हान याला घटस्फोट देणार असल्याचे देखील सांगण्यात आले. मात्र, हा करार यांंग हीने पाळला नाही. त्यामुळे पैसे परत करावेत, अशी मागणी शी हीने केली. मात्र, कोर्टाने शी यांच्या विरोधात निकाल देत शी यांनी सामाजिक नैतिकतेचेही उल्लंघन केल्याचे म्हटलं. यांग आणि हान पती पत्नी असतांना पैशाच्या बळावर यांग हिला फसवून लग्न करायचे होते, असे कोर्टाने म्हटले. चीनमध्ये घटस्फोटाच्या याचिकेनंतर किमान ३० दिवसांचा कुलिंग ऑफ पीरियड दिला जातो, त्यानंतरच निकाल दिला जातो.
हान यांनी पत्नीला न सांगता शी हिच्यावर ६ दशलक्ष युआन खर्च केल्याचेही समोर आले आहे. चीनच्या कायदे तज्ज्ञाने सांगितले की, आता हानवर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. कायदेशीररित्या लग्न झाल्यानंतरही तो दुसऱ्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. कोर्टाच्या या निर्णयावर चीनमधील अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. त्या महिलेने दुसऱ्या महिलेला फसवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तिला ना प्रियकर मिळाला, ना पैसा.
संबंधित बातम्या