चार मुलांची आई असलेल्या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ३ वर्षे बलात्कार अन् लग्नास नकार दिल्यावर..
एका तरुणाने चार मुलांच्या आईला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले व अनेक वर्षे तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
उत्तरप्रदेश राज्यातील पीलीभीतमध्ये एका तरुणाने चार मुलांच्या आईला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले व अनेक वर्षे तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यानंतर जेव्हा लग्नाचा विषय काढला त्यावेळी आरोपीने नकार दिला. लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करत गुन्हा दाखल केला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
शहरातील एक गल्लीत राहणाऱ्या चार मुलांच्या आईला पैशाचे लालच दाखवून रेल्वे कॉलोनीत राहणाऱ्या सतेंद्र भदोरिया याने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढळे. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर तीन वर्षे बलात्कार केला. महिलेने लग्नाचा विषय काढल्यावर तो टाळत असे. मागील महिन्यात महिलेने पुन्हा विषय काढल्यावर आरोपीने स्पष्ट नकार दिला. लग्नासाठी दबाव टाकल्यास ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी महिलेने २० फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र आरोपीवर कोणतीही कारवाई झाली नाही. आता एसपीच्याआदेशावर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. महिलेने तक्रारीत म्हटले की, आरोपी तिला नेहमी धमकी देत आहे. त्याच्यापासून तिच्या जीवाला धोका आहे. तिने आपल्या चार मुलांच्या जीवासही धोका असल्याचे म्हटले आहे.
कोतवाल आशुतोष रघुवंशी यांनी सांगितले की, पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने आरोपीविरुद्ध बलात्कारसहित अन्य कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
विभाग