Uttar Pradesh : प्रेयसीने प्रियकराला सेक्समध्ये गुंतवले! पाठीमागून येऊन बॉयफ्रेंडने चिरला गळा! लव्ह ट्रँगलमधून हत्याकांड
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Uttar Pradesh : प्रेयसीने प्रियकराला सेक्समध्ये गुंतवले! पाठीमागून येऊन बॉयफ्रेंडने चिरला गळा! लव्ह ट्रँगलमधून हत्याकांड

Uttar Pradesh : प्रेयसीने प्रियकराला सेक्समध्ये गुंतवले! पाठीमागून येऊन बॉयफ्रेंडने चिरला गळा! लव्ह ट्रँगलमधून हत्याकांड

Published Apr 09, 2024 06:11 PM IST

uttar pradesh budaun murder : उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. लव्ह ट्रँगलमधून एका प्रियकराची गळाचिरून हात्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

प्रेयसीने प्रियकराला सेक्समध्ये गुंतवले! पाठीमागून येऊन बॉयफ्रेंडने चिरला गळा!
प्रेयसीने प्रियकराला सेक्समध्ये गुंतवले! पाठीमागून येऊन बॉयफ्रेंडने चिरला गळा!

uttar pradesh budaun murder : उत्तर प्रदेशातील बदायू येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. लव्ह ट्रँगलमधून एका तरुणाची गळा चिरून हात्या करण्यात आली. हत्या करण्याआधी प्रेयसिने प्रियकरला शारीरिक संबंधात गुंतवले. यानंतर तिच्या दुसऱ्या बॉयफ्रेंडने पहिल्या प्रियकरांची गळा चिरून हत्या केली. पोलिसांनी प्रियकर आणि प्रेयसीला अटक केली आहे.

Maharashtra Monsoon : उन्हात होरपळणाऱ्या महाराष्ट्रासाठी गारेगार बातमी! यंदा मान्सून जोरदार बरसणार, स्कायमेटचा अंदाज

उत्तर प्रदेशातील बदायूं येथील शिवांशू गौतम हत्या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या प्रेयसीला आणि तिच्या प्रियकरला अटक केली आहे. चौकशीदरम्यान तरुणीने शिवांशूची हात्या केल्याची कबुली दिली आहे. यामुळे पोलिस देखील चक्रावले आहेत. तिने निष्ठुरपणे कसे आपल्या प्रियकराला मारले हे देखील तिने सांगितले.

या घटनेचे वृत्त असे की, तनु नामक आरोपी मुलीचे शिवांशू आणि सनीसोबत मैत्री होती. दरम्यान, शिवांशूसोबत तिचे दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. हा प्रकार तिचा दुसरा प्रियकर सनीला कळताच तो भडकला. दरम्यान, तरुणी आणि सनीने त्याचा काटा काढण्याचे ठरवले आणि त्याच्या खुनाचा कट रचला. ठरल्या प्रमाणे तनुने शिवांशूला भेटण्यासाठी तिच्या घरी बोलावले. सनी तिथे आधीच लपून बसला होता. तरुणीने शिवांशूशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत गुंतवून ठेवले. यावेळी बेसावध असतांना सनीने शीवांशूचा गळा चिरून त्याची हत्या केली.

PBKS vs SRH Dream 11 Prediction : ड्रीम इलेव्हनवर क्लासेनला बनवा कर्णधार, आज हे ११ खेळाडू तुम्हाला मालामाल करणार, पाहा

बरेलीच्या सिव्हिल लाइन्स कोतवाली भागातील आरिफपूर नवाडा येथे राहणारा २१ वर्षीय शिवांशू गौतम हा बीएससीच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता. तो वडिलांच्या किराणा दुकानात काम करून त्यांना मदत करायचा. २ एप्रिल रोजी सायंकाळी तो मित्राच्या घरी जात असल्याचे सांगून दुचाकीवरून निघून गेला. सोमवारी, गोणीत बांधलेला अवस्थेत शिवांशूचा मृतदेह बरेलीच्या वंशीनागळाजवळील रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या झुडपात सापडला. या प्रकरणी पोलिसांनी तुनसह तिचा प्रियकर सनी कश्यप याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra Monsoon : उन्हात होरपळणाऱ्या महाराष्ट्रासाठी गारेगार बातमी! यंदा मान्सून जोरदार बरसणार, स्कायमेटचा अंदाज

पोलीस चौकशीत तनूने सांगितले की, शिवांशू आणि सनी दोघे चांगले मित्र होते. हे तिघेही नेटवर्क मार्केटिंगशी संबंधित होते. त्यामुळे तिचा प्रियकर सनीने दीड वर्षांपूर्वी तिची शिवांशूशी ओळख करून दिली होती. तेव्हा ती शिवांशूला ओळखत नव्हती. भेटल्यावर तिचं आणि शिवांशूचं बोलणं सुरू झालं. सुरुवातीला सनीने याला कधीच विरोध केला नव्हता. त्यामुळे तनुची शिवांशूशी जवळीक वाढली. तनुने शिवांशूकडून गरजेपोटी अनेक वेळा पैसेही घेतले होते.

शारीरिक संबंधात गुंतून केला खून

दरम्यान, तिचे शिवांशूसोबत अनेकवेळा शारीरिक संबंधही ठेवले होते. शिवांशूला तनु रोज भेटत होती. मात्र, तिचा दुसरा प्रियकर सनीला याची माहिती मिळताच त्याने तनुला त्याच्याशी संबंध तोंडण्यास सांगितले. तनुचेही सनीवर प्रेम होते. त्यामुळे दोघांनी मिळून शिवांशूचा खून करण्याचे ठरवले. त्यांनी शिवांशूला २ एप्रिलला बरेलीला बोलावले. जिथे दोघे दोन तास फिरत राहिले. यानंतर रात्री दहाच्या सुमारास सुभाषनगर येथील तनुच्या घरी दोघे गेले. यावेळी सनी आधीच तनुच्या खोलीत लपून बसला होता. जेव्हा दोघांचे शारीरिक संबंध सुरू झाले. त्यानंतर सनीने मागून येऊन शिवांशूचा गळा चिरला. यावेळी तनुने शिवांशूचे हात घरून ठेवले होते. काही वेळातच शिवांशूचा मृत्यू झाला. यानंतर दोघांनी मृतदेह खोलीत लपवून ठेवला. व सकाळी गोणीत भरून रेल्वे रुळाजवळ झाडाझुडपात फेकून दिला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर