''घर बांधू, संसार फुलवू आणि मग...'' शहीद कॅप्टन अंशुमनच्या पत्नीचा Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही अश्रू
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ''घर बांधू, संसार फुलवू आणि मग...'' शहीद कॅप्टन अंशुमनच्या पत्नीचा Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही अश्रू

''घर बांधू, संसार फुलवू आणि मग...'' शहीद कॅप्टन अंशुमनच्या पत्नीचा Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही अश्रू

Jul 07, 2024 10:52 AM IST

Captain Anshuman Singh: शहीद कॅप्टन अंशुमन सिंह हे भारतीय सीमेचे रक्षण करतांना शहीद झाले. त्यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या पत्नी स्मृती यांनी हे पदक राष्ट्रपती यांच्याहस्ते स्वीकारले. यावेळी त्यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादामुळे सर्वांचे डोळे पाणावले.

''घर बांधू, संसार फुलवू आणि मग...'' शहीद कॅप्टन अंशुमनच्या पत्नीचा Video पाहून तुम्हालाही आवरनार नाही अश्रू
''घर बांधू, संसार फुलवू आणि मग...'' शहीद कॅप्टन अंशुमनच्या पत्नीचा Video पाहून तुम्हालाही आवरनार नाही अश्रू

 Captain Anshuman Singh: भारतीय सीमेचे रक्षण करण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या लष्करी अधिकारी जवानांची शौर्य गाथा ऐकून अभिमानाने ऊर भरून येतं, पण त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदना पाहून मात्र, काळीज पिळवटून जाते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी जवानांना त्यांच्या शौर्य आणि वीरताबद्दल कीर्ती चक्र व शौर्य चक्र पदकाने सन्मानित करण्यात आले. शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पत्नी पदक घेतांना आल्या तेव्हा सर्वांचे डोळे अश्रुंनी डबडबले होते.

भारतीय सैन्य दलातील १० जवानांचा कीर्ती चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यातील ७ शहीद जवानांना मरणोत्तर पदक देण्यात आले. यावेळी शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांना कीर्ती चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. हे पदक अंशुमन यांच्या पत्नी स्मृती सिंह आणि त्यांची आई मंजू सिंह यांनी स्वीकारले. यावेळी स्मृती सिंह यांच्या चेहऱ्यावरील भाव व डोळ्यातील अश्रू पाहून अनेकांना भरून आले होते. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.

शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांची पत्नी स्मृती सिंह यांनी पतीच्या हौतात्म्यापूर्वीचे काही क्षण आठवले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक जण भारावले. कॅप्टन अंशुमन १९ जुलै २०२३ ला सियाचीन ग्लेशियर येथे तंबूला लागलेल्या आगीच्या त्यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. मृत्यूपूर्वी त्यांचे पाच महिन्यांआधी लग्न झाले होते. त्यांची बदली ही सियाचीन येथे झाली होती. ते लष्करात डॉक्टर होते. आपल्या पतीसोबतच्या जुन्या क्षणांची आठवण करून देताना पत्नी स्मृती सिंह म्हणाल्या, गेल्या वर्षी १८ जुलैच्या रात्री त्यांचे आणि अंशुमन यांच्याशी बोलणे झाले होते. आणि दुसऱ्या दिवशी (१९ जुलै) कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या मृत्यूची बातमी आली. स्मृती म्हणल्या, दोघेही पहिल्याच नजरेत प्रेमात पडले होते. शहीद होण्याच्या आदल्या रात्री झालेल्या संवादात त्यांनी त्यांच्या आयुष्याची स्वप्न रंगवली होती. त्यांना घर बांधायचे होते. तसेच त्यांना त्यांचा संसार देखील फुलवायचा होता. पण दुसऱ्याच दिवशी त्यांच्या मृत्यूची बातमी आल्याने सर्व काही एका क्षणात संपलं.

दोघेही कॉलेजमध्ये भेटले; पहिल्याच भेटीत पडले एकमेकांच्या प्रेमात

स्मृती सिंग आणि कॅप्टन अंशुमन यांची कॉलेजमध्ये भेट झाली होती. स्मृती म्हणाली, "आम्ही कॉलेजच्या पहिल्याच दिवशी भेटलो. आम्ही आमच्या पहिल्याच भेटीत एकमेकांना पसंत केलं होतं. महिनाभरानंतर त्याची निवड पुण्यातील लष्कराच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये (एएफएमसी) झाली. अंशुमन अतिशय हुशार होता, आमची फक्त एक महिने भेट झाली. यानंतर तब्बल ८ वर्ष आम्ही लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहिलो. या दरम्यान आम्ही लग्न करायचं ठरवलं. हे सांगतांना स्मृती यांना अश्रु आवरले नाहीत. अंशुमन आणि स्मृती सिंह यांचा विवाह फेब्रुवारी २०२३ मध्ये झाला होता.

५० वर्षांच्या आयुष्याबद्दल बोललो

स्मृती पुढे म्हणाल्या, १८ जुलै आम्ही आमच्या पुढच्या आयुष्याबद्दल बोललो. आमच्या संसारा बद्दल आम्ही अनेक स्वप्न रंगवली. पुढील ५० वर्षांमध्ये काय काय करायचे या बद्दल आम्ही बोललो. आम्हाला घर बांधायचे होते. आमच्या होणाऱ्या मुलांबद्दल देखील आम्ही स्वप्न रंगवली होती. मात्र, १९ तारखेला सकाळी उठल्यावर मला फोन आला की ते शहीद झाले. स्मृती पुढे म्हणाल्य, पहिले ७ ते ८ या गोष्टीवर मला विश्वासच बसला नाही. ही बाब मी आत्तापर्यंत मान्य करू शकले नाही. मात्र, आज माझ्या हातात अंशुमन याचे कीर्तीचक्र आहे. अंशुमन हा खरा हिरो आहे.

सहकारी सैनिकांचे प्राण वाचवतांना अंशुमन शहीद

कॅप्टन अंशुमन सिंग हे सियाचीनमध्ये तैनात होते. दरम्यान, १९ जुलै २०२३ मध्ये शॉर्ट सर्किटमुळे भारतीय लष्कराच्या दारूगोळा भांडारात आग लागली होती. कॅप्टनने धाडस दाखवत फायबर ग्लासच्या तंबूत अडकलेल्या आपल्या सहकारी सैनिकांचे प्राण वाचवले. मात्र, यादरम्यान अंशुमन हे आतच अडकले आणि शहीद झाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर